मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:46 IST

उद्धव ठाकरेंची मोठी मागणी: निवडणूक आयुक्तांना तातडीनं अटक करा

निवडणूक आयोगात एसआयआर आणि मतदान यंत्रांसह अनेक मुद्द्यांवरून उभी फूट पडल्याचं वृत्त बुधवारी समोर आलं. त्यानंतर विरोधकांनी आयोगावर टीका सुरू केली आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक करण्याची मागणी केली.

उद्धव ठाकरेंची मोठी मागणी: निवडणूक आयुक्तांना तातडीनं अटक करा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

एसआयआर आणि मतदान यंत्रांसह अनेक मुद्द्यांवरून केंद्रीय निवडणूक आयोगात उभी फूट पडल्याचं वृत्त बुधवारी समोर आलं आणि त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले. बुधवारी सकाळपासूनच विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका सुरू केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्तांना तातडीनं अटक करावी, अशी मागणी केली.

केंद्रीय निवडणूक आयोग हा तीनसदस्यीय आयोग आहे. या आयोगातील विरोध डावलून किंवा इतर सदस्यांचं मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अनेक निर्णय घेतल्याच्या तक्रारी आयोगातील उर्वरित दोन सदस्य म्हणजे सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केल्याचं समोर आलं आहे. या घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची मनमानी सुरू असल्याची पुष्टी आज झाली असून पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आज ज्ञानेश कुमार यांचा विद्रूप चेहरा सर्वांसमोर आला असून त्यांना तातडीनं तुरुंगात टाकावं, अशी मागणी त्यांनी केली.

मागील काही वर्षांपासून आम्ही या सगळ्या प्रकारांविरोधात सातत्यानं आवाज उठवत होतो आणि आज ते खरं ठरताना दिसत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोग आता संधू आणि जोशी या दोन आयुक्तांचा झाला आहे, असंही ते म्हणाले. या दोन आयुक्तांचं आयोगात बहुमत झाल्यानं त्यांनीच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आयोगातून बाजूला केलं आहे, असं मानायला हरकत नाही, असा दावा त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतात एक टोळी हैदोस घालत असून ही टोळी राजकीय पक्ष फोडणं, दुसऱ्यांचे पक्ष चोरणं आणि लोकशाहीचा खून करणं असे प्रकार करते. या टोळीचे मुख्य सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत, त्यामुळे त्यांना तातडीनं तुरुंगात टाकलं पाहिजे, असं ते म्हणाले.

ही टोळी नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती, हे आता लोकांना कळलं आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. निवडणूक आयोग केंद्रीय गृहखात्याच्या सूचना मानतो असं बोललं जातं, त्यामुळे याचे खरे सूत्रधार गृहमंत्री आहेत का, याचाही खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ