मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:46 IST
अनुवाद झालेला नाही

महाराष्ट्रातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित.

राज्यातील सुमारे ७५% तालुक्यांना दुष्काळाचा फटका.

महाराष्ट्रातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित.

मुंबई,

२६ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्रातील पावसाची कमतरता आणि खरीप पिकांवरील परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाच्या निकषांनुसार 'ट्रिगर-१' लागू झालेल्या या तालुक्यांचा शासनाच्या निर्णयात समावेश करण्यात आला आहे.

राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील एकूण पावसाची तूट १८.८ टक्के नोंदवण्यात आली असून काही भागांमध्ये जुलैपासूनच पावसाचा मोठा खंड पडला आहे. याचा परिणाम सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि इतर पिकांवर झाला आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी उपाययोजना

दुष्काळ जाहीर झालेल्या भागांमध्ये शासनाच्या नियमानुसार जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा आणि रोजगार हमीच्या कामांना चालना अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पीक नुकसानीची आर्थिक मदत या घोषणेत स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आलेली नाही. संबंधित भागात पंचनामे आणि नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर त्यानुसार पुढील आर्थिक मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाला नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रभावित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्रातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने आता शासनाच्या मदत व सवलतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, याकडे शेतकरी आणि ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ