मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:46 IST

पंचनाम्यावर आता शेतकऱ्याची सही बंधनकारक, कृषी आयुक्तालयाचे राज्यभरातील अधिकाऱ्यांना पत्र

दुष्काळसदृश स्थितीत नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे कृषी विभागाने बंधनकारक केले आहे. यासाठीचे प्रपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पंचनाम्यावर आता शेतकऱ्याची सही बंधनकारक, कृषी आयुक्तालयाचे राज्यभरातील अधिकाऱ्यांना पत्र
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया राज्यभरात सुरू केली आहे. असे असतानाच कृषी आयुक्तालयाने राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना सूचनांचे पत्र पाठवले आहे. या पत्रात कृषी पंचनामा करताना संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही स्वाक्षरी घेणे आता बंधनकारक आहे. या संदर्भातले प्रपत्र, म्हणजेच प्रोफार्माही कृषी विभागाने प्रसिद्ध केले आहे.

फर्स्ट ट्रिगरनुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्या तालुक्यांमध्ये पंचनामा करताना प्रत्येक शेतकऱ्याचे फार्मर आयडी, म्हणजेच ॲग्री स्टॅक कार्ड, घ्यावे, असे पत्रात सांगितले आहे. ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नसेल, त्याचे आधार कार्ड नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ग्राह्य धरावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचनामा अहवाल संबंधित विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून लवकरात लवकर कृषी आयुक्तालयात सादर करायचा आहे, असेही पत्रात म्हटले आहे.

कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रपत्रात शेतकऱ्याचे नाव, त्याचे बाधित पीक आणि नुकसान झाल्याची टक्केवारी लिहायची आहे. त्याबरोबर फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक आणि शेतकऱ्याच्या बँक खात्याची सर्व माहितीही भरायची आहे. सर्वात शेवटी पंचनामा पूर्ण केल्याबद्दल शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अस्मानी संकटात शेतकऱ्यांचे याआधीही नुकसान होत होते आणि कृषी विभागाकडून पंचनामे केले जात होते. पण त्या पंचनाम्यांवरून आरोप-प्रत्यारोप होत होते. खरी स्थिती अशी होती की बऱ्याच ठिकाणी कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी गावात एका ठिकाणी बसून पंचनामे करून घ्यायचे. अधिकारी प्रत्येक शेतावर जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असायची.

यंदा मात्र दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे आणि शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी कृषी आयुक्तालयाने संपूर्ण राज्यातील कृषी विभागाच्या कार्यालयांना हे पत्र पाठवले. त्यासोबत एक प्रपत्रही जोडले आहे. यंदाचा हा एक महत्त्वाचा बदल दिसतो आहे. प्रपत्रातील शेवटच्या कॉलममध्ये पंचनामा झालेल्या शेतकऱ्याची सही घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पंचनाम्यात कुठेतरी पारदर्शकता दिसून येईल आणि शेतकरी या निर्णयाचे स्वागत करत आहेत.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ