मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:47 IST

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र, 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

निवडणूक आयोगाच्या कारभारावरून देशभर गदारोळ सुरू असताना राज ठाकरे यांनी SIR विरोधात 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा काढला जाणार असल्याची घोषणा केली आहे.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र, 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

निवडणूक आयोगाच्या कारभारावरून देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठे जनआंदोलन उभे केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

राज ठाकरे यांनी याआधीही आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा नव्याने पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा काढला जाणार असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच या मोर्चाच्या आयोजनामागे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून लिहिले आहे की, देशातील सत्ताधारी पक्षाची जणू आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने एसआयआरच्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबर 2026 ला मुंबईत जनमोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या आयोजनात मनसे आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा मोर्चा एका पक्षापुरता मर्यादित नाही, तर तो जनतेचा मोर्चा आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. हा मोर्चा तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज व्हावा यासाठी सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधला जाणार असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

पुढे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोर्चाची नेमकी वेळ आणि जागा लवकरच कळवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एसआयआरविरोधातील या जनमोर्चात भेटूया, देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, असे आवाहनही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केले आहे.

आपल्या पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असा उल्लेख करत या लढाईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच 26 सप्टेंबरला सकाळी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, ज्यातून आगामी आंदोलनाबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याचे दिसून आले आहे. दोन्ही शिवसेना गटांमधील नेत्यांची ही भेट आणि त्यानंतर आलेली मोर्चाची घोषणा यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आता 4 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या या जनमोर्चाला किती राजकीय पक्ष सहभागी होतात आणि किती जनतेचा प्रतिसाद मिळतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ