मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:41 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत, ट्रिगर-1 चा आदेश उद्याच - मुख्यमंत्री फडणवीस

वाशिममधील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि तातडीच्या मदतीची घोषणा केली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत, ट्रिगर-1 चा आदेश उद्याच - मुख्यमंत्री फडणवीस
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचा फटका बसल्याने पिकं धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिममधील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. दौऱ्यानंतर त्यांनी अमरावती विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि दुष्काळ संहितेच्या 'ट्रिगर-1' नुसार दिली जाणारी मदत तातडीने देण्याचे आदेश उद्याच काढले जातील, अशी घोषणा केली.

अमरावती विभागातल्या सगळ्याच जिल्ह्यांना दुष्काळाची झळ बसली आहे, त्यामुळे पिकं अडचणीत आली आहेत. शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा म्हणूनच हा दौरा झाला. वाशिमच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासोबत अमरावती विमानतळावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकार स्वतःहून शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार आहे. सोबतच केंद्राकडून मदत मिळण्यासाठी लागणारे पंचनामे वगैरे प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावही पाठवला जाणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांसाठी मदतीचा आदेश लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे, कारण जवळपास सगळीकडेच मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. पुढच्या काळात चारा आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या लागणार आहेत, तसेच अन्नधान्याचीही मदत द्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू नये, यासाठी त्यांना थेट मदत दिली जाणार आहे.

रब्बी हंगामात काही भागांत उपलब्ध असलेल्या पाण्यावर पीक घेता येईल का, याची पडताळणी केली जाणार आहे. रब्बी पीक घेण्यासाठीही शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जाणार आहे. जलसाठे आटलेले असल्याने त्यातला गाळ काढणं, जलतारा स्ट्रक्चर उभारणं आणि दुरुस्तीची गरज असलेले तलाव शोधून त्यांची दुरुस्ती करणं, अशी कामं हाती घेतली जातील.

राज्यभरात पिकांची परिस्थिती सारखीच असल्याने राज्य सरकारने मदतीचं धोरण आखलं आहे. शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीआधी मिळावी, अशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी दिली असून त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे, त्यांना बँकांनी नियमाप्रमाणे नवीन कर्ज द्यायलाच हवं. याशिवाय शेतमालाची खरेदी शासकीय दराने केली जाणार असून त्यासाठीची नोंदणी लवकरच सुरू केली जाईल.

जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीचा अहवाल सार्वजनिक केला जाणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ