दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अग्रीम मदत; टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरून विरोधक टीका करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अमरावती : राज्यात यंदा दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे आणि सरकारने आत्तापासूनच पाणीकपात सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काळात पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने 306 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून पिकांचे पंचनामेही करण्यात आले आहेत.
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5000 रुपयांची अग्रीम मदत जाहीर करण्यात आली. मात्र 5 हजार रुपयांत कुठे दिवाळी होते का, 5 हजार रुपयांत काय होणार, असे म्हणत विरोधक सरकारवर टीका करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना अग्रीम मदत पहिल्यांदाच दिली गेली आहे आणि राज्याच्या इतिहासात डिसेंबरच्या आधी कधीच पैसे मिळालेले नाहीत. आता 'इंडिया रेप'च्या कायद्यामुळे पैसे देणे शक्य झाले, त्यातून आपण मार्ग काढला आणि पाच हजार रुपये दिले, असे ते म्हणाले. आतापर्यंत बघितले तर मिनिमम पैसे हजार रुपये असतात. कमीत कमी आराजी असलेल्या शेतकऱ्यालाही किमान पाच हजार रुपये मिळतील, असे त्यांनी सांगितले. बाकीच्यांना कंपल्सशन मिळेल तेव्हा उर्वरित पैसे मिळतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
कर्नाटकचे उदाहरण देत फडणवीस म्हणाले की, आपल्याच बाजूला कर्नाटक राज्य आहे, तिथेही इतकाच भीषण दुष्काळ आहे, पण तिथे त्यांनी अडीच हजार रुपये दिले. काँग्रेसचे नेते जीआर का काढत नाही, असे म्हणतात. कर्नाटकने जीआर काढल्यानंतर आता ते मूग गिळून बसलेले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाबाबत होत असलेल्या टीकेवरून काँग्रेसवर पलटवार केला.
महाराष्ट्रात आम्ही पाच हजार रुपये दिले आहेत, शेतकऱ्यांचे दुःख मोठे आहे आणि त्या दुःखाच्या तुलनेत पाच हजार रुपये फार मोठा आकडा नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. पण काही ना काही मदत शेतकऱ्यांना मिळेल, असेही ते म्हणाले. आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले तेव्हा हेच काँग्रेसवाले विरोधी पक्षाचे नेते नावे ठेवत होते, असे त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांची व्हॅल्यू माहिती होती, तशीच शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची किंमत माहिती आहे, असे ते म्हणाले. जे मोठमोठ्या बंगल्यात राहतात आणि ज्यांच्या मोठमोठ्या गाड्या फिरतात, त्यांना पाच हजार रुपयांची किंमत समजू शकत नाही, असे म्हणत फडणवीस यांनी टीकाकारांवर हल्लाबोलही केला.
अर्थमंत्रिपदाबाबत : आमदार रोहित पवार यांनी अर्थमंत्रिपदासंदर्भात वक्तव्य केले होते. भाजप सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रिपद देणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. आमची चर्चा झाली आहे, आम्ही बघून घेऊ, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.