बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:32 IST

गिरीश व्यास यांनी राजीनामा मागे घेतला; पक्ष नेतृत्वाला अप्रिय निर्णय घ्यावे लागतात, असे ते म्हणाले

गिरीश व्यास यांनी राजीनामा मागे घेतला; पक्ष नेतृत्वाला अप्रिय निर्णय घ्यावे लागतात, असे ते म्हणाले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा आज, 13 ऑक्टोबर रोजी परत घेतला. राजीनामा मागे घेताना पक्ष नेतृत्वाबद्दलची त्यांची भाषा पूर्णपणे बदलून गेली आहे. संघटनात्मक कामे सांभाळताना पक्ष नेतृत्वाला अनेक वेळा अप्रिय निर्णय घ्यावे लागतात, त्याचा अर्थ निर्णय प्रक्रिया निरंकुश झाली आहे असा होत नाही, असे व्यास म्हणाले.

या वादाची सुरुवात 9 ऑक्टोबर रोजी झाली होती. विधान परिषद निवडणुकीसाठी (नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026) सुधाकर कोहळे यांची उमेदवारी निश्चित करताना संघटनात्मक प्रक्रिया पाळली गेली नाही, तसेच उमेदवार निवडीच्या आधीच उमेदवाराची घोषणा करण्यात आली, असे आरोप व्यास यांनी तेव्हा केले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

आज राजीनामा मागे घेताना व्यास यांनी सांगितले की, पक्ष नेतृत्वाने काल आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते मान्यही केले. आता नेतृत्वाने आम्हाला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असेही व्यास म्हणाले.

आपली भूमिका मांडताना व्यास यांनी सांगितले, की पक्षात संवादाचा अभाव होता आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचाही अभाव होता. आम्ही निर्णय प्रक्रियेतील निरंकुशतेचा शब्दप्रयोग केला होता, मात्र संघटनेचे काम सांभाळताना पक्ष नेतृत्वाला कधीकधी अप्रिय निर्णय घ्यावे लागतात, हेही मान्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.

व्यास यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या मनातले भाव पक्ष नेतृत्वाला सांगितले. आपण स्वतःसाठी काहीच मागितले नव्हते, असे ते म्हणाले. पक्षामध्ये संवाद नाही, कोणी कोणाशी बोलत नाही, असंख्य कार्यकर्त्यांना कोणी विचारत नाही, ही आपली तक्रार होती, असे त्यांनी सांगितले. भाजप हा केडर आधारित पक्ष आहे, त्यामुळे पक्षाने आपल्या अंतर्गत संविधानाची पद्धत सोडू नये, अशीही आमची तक्रार होती, असे व्यास यांनी स्पष्ट केले. ही तक्रार पक्ष नेतृत्वाने मान्य केली, असेही ते म्हणाले.

सगळे काही सांभाळताना आमचे काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, हेही पक्ष नेतृत्वाने मान्य केले, असे व्यास यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत जे लोक पक्षाच्या बाहेर गेले होते, किंवा ज्यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते, त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी आमची मागणी असल्याचे गिरीश व्यास यावेळी म्हणाले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ