बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:31 IST

रिपब्लिकन पक्ष जिंकल्यास प्रत्येक प्रौढ अमेरिकनला 5 हजार डॉलर, ट्रम्प यांचे आश्वासन

मध्यावधी निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाने दोन्ही सभागृहांवर नियंत्रण कायम ठेवल्यास प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला 5 हजार डॉलर देणार, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलास्कातील प्रचारसभेत सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे आश्वासन दिले आहे. काँग्रेसच्या प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर रिपब्लिकन पक्षाने नियंत्रण कायम ठेवल्यास प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला 5 हजार डॉलर देणार, असे त्यांनी सांगितले आहे. भारतीय चलनात मोजायचे झाले, तर ही रक्कम 4, 75, 000 च्या घरात जाते.

अलास्कातील वासिला येथे रिपब्लिकन सिनेटर डॅन सुलिव्हन यांच्या प्रचारसभेत ट्रम्प बोलत होते. या वेळी त्यांनी प्रस्तावित आर्थिक मदतीला 'ट्रम्प डिव्हिडंड' असे संबोधले. आयात शुल्कातून (टॅरिफ) मिळणाऱ्या महसुलाचा वापर या रकमेसाठी केला जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प म्हणाले, रिपब्लिकन पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांच्या निवडणुका जिंकल्यास मी अमेरिकेतील सर्व प्रौढ नागरिकांना 5 हजार डॉलर देईन. टॅरिफमधून मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे आणि त्याचा वापर या योजनेसाठी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ही रक्कम नेमकी कधी आणि कोणत्या पद्धतीने दिली जाणार, याची सविस्तर माहिती ट्रम्प यांनी दिली नाही. या योजनेसाठी किती खर्च येईल, हेही त्यांनी स्पष्ट केलेले नाही. अशी रक्कम वाटण्यासाठी काँग्रेसची मंजुरी आवश्यक असेल.

प्रचारसभेत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावरही निशाणा साधला. डेमोक्रॅट पक्षाने निवडणूक जिंकल्यास अमेरिकेला 1929 सालासारख्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल, असा दावा त्यांनी केला. मात्र या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी ठोस पुरावे दिले नाहीत. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प रिपब्लिकन उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत.

इराणबद्दल बोलताना ट्रम्प यांनी तेहरानला अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत, असे सांगितले. युद्ध लवकरच संपेल आणि त्यानंतर किमती वेगाने कमी होतील, असा दावाही त्यांनी केला.

सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि तेल वाहतुकीचा उल्लेख करताना, युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत सध्या अधिक तेलाची वाहतूक होत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र या दाव्याबाबत त्यांनी अधिक तपशील दिला नाही.

ट्रम्प यांनी कॅनडावर अमेरिकेचा अनेक वर्षे गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाने २.५ कोटी लोकांना अमेरिकेच्या सीमेत प्रवेश दिल्याचा दावा त्यांनी केला. या आकड्याच्या समर्थनार्थ त्यांनी पुरावे सादर केले नाहीत.

याशिवाय, वाहनांच्या उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत बदल करून 'क्लीन एअर ॲक्ट'चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अलास्कातील दोन डिझेल मेकॅनिकसाठी त्यांनी माफीपत्रांवर स्वाक्षरी केली. वाहनांचे इंजिन दुरुस्त केल्याबद्दल संबंधित व्यक्तींना दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी टीकाही त्यांनी केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ