बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:13 IST

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचे आंदोलन, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचे आंदोलन, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

काँग्रेसचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्यावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. क्रांती चौकात झालेल्या या आंदोलनात खासदारांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्याविरोधात ११ विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची तक्रार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगरातही उमटले आणि भाजपच्या वतीने क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. त्यांच्यासोबत माजी आमदार संजय केणेकर आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित होते. याशिवाय भाजपचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडल्या. ज्या खासदारांवर हे आरोप झाले आहेत, त्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, तसेच पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. खासदार डॉ. अंगोमचा बिमोल यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि त्यांना काँग्रेसमधून बडतर्फ करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.

एका लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचे आरोप होणे गंभीर आहे, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले. त्यामुळे काँग्रेसने या प्रकरणात तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेसची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असल्याचेही सांगण्यात आले. आरोपांमध्ये किती सत्यता आहे आणि प्रकरणातील पुढील तपशील काय आहेत, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ