बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

अनिल सोले यांची बंडखोरी मागे, गिरीश व्यास यांचाही राजीनामा मागे

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत संघर्षावर पडदा पडला असून आता भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात थेट लढत होणार आहे.

अनिल सोले यांची बंडखोरी मागे, गिरीश व्यास यांचाही राजीनामा मागे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर, दि. १३ : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर अखेर पडदा पडला आहे. बंडखोरीचा पवित्रा घेत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दुसरीकडे, पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणारे भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांची नाराजीही दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. व्यास यांनी अनिल सोले यांच्या बंडखोरीला पाठिंबा दिला होता. आता त्यांचाही राजीनामा मागे घेण्यात आला आहे.

या मतदारसंघात भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना संधी देऊन यंदा मैदानात उतरवले होते. मात्र याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास अनिल सोले हेही इच्छुक होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला. पाठोपाठ गिरीश व्यास यांनीही सोले यांच्या भूमिकेला जाहीर समर्थन दिले होते. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपसमोरच मोठे आव्हान उभे राहिले होते.

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आवश्यक नियोजन आणि रणनीती आखण्याच्या उद्देशाने काल (१२ ऑक्टोबर) नागपुरात भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारीही बैठकीत हजर होते. पक्षातील बंड शमवण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सोले यांच्याशी संवाद साधून त्यांची मनधरणी केली. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सोले यांच्या घरी भेट दिली होती. मात्र तेव्हा सोले बाहेर असल्यामुळे त्यांची चव्हाण यांच्याशी भेट झाली नव्हती.

एकंदरीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देत बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी माघार घेतली आणि अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे नागपूर भाजपमधील अंतर्गत वाद निवळला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई फळाला आली आहे. पक्षश्रेष्ठींच्या प्रयत्नांना अशा प्रकारे यश आले आहे. आता नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात थेट सामना रंगणार आहे, म्हणजेच ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ होणार आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ