मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
08:40  मुंबई लोकल ठप्प: गर्दीत श्वास कोंडला, प्रवाशांनी सांगितले तासन्तास अडकल्याचे हाल 08:00  कांजूरमार्गजवळ रिले हटला आग, सिग्नल बंद पडल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडली 00:00  कॉम्प्युटर क्लासनंतर घरी निघालेल्या साहिलचा लोकलच्या धडकेत मृत्यू; रेल्वेच्या गलथान कारभारामुळे गेला 18:26  घाटकोपरमध्ये स्कायवॉकवरून फेकलेल्या नऊ महिन्यांच्या बाळाचा सायन रुग्णालयात मृत्यू, वडील जाफर शेख अटकेत 08:24  मुंबई: लोकल उशिरा धावल्याने दादर स्टेशनवर प्रचंड गर्दी, गाडीत चढताना प्रवाशांचे हाल 07:24  ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून दर बुधवारी 24 तास पाणी बंद, पाणीटंचाईच्या तयारीसाठी महापालिकेचा निर्णय
सर्व थेट अपडेट
AQI 303 | Very Poor 18:40 IST

जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपचे पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भाजपचं टेन्शन वाढणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिंदे गट हा विषय लावून धरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपचे पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भाजपचं टेन्शन वाढणार? छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. जरांगे यांना गप्प करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचं या क्लिपमध्ये म्हटलं आहे. राज्यात नरेटिव्ह पसरवण्यासाठी भाजपने कशा प्रकारे षडयंत्र रचले होते, याचाही पर्दाफाश या क्लिपमधून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. मात्र एसआयटीमार्फत चौकशी करा, पण आधी या प्रकरणी गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. म्हणजेच चौकशीच्या आधी पोलिसांत गुन्ह्याची नोंद व्हावी, असा विरोधकांचा आग्रह आहे.

याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून ती वादळी ठरण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपचे पडसाद या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. कॅबिनेट बैठकीत या क्लिपवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गट आजच्या बैठकीत हा विषय लावून धरणार असल्याने भाजपचं टेन्शन वाढणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांत या क्लिपमुळे भाजप आणि शिवसेनेचे आमदार व नेते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेनेच्या काही नेत्यांनी थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता, तर भाजपच्या नेत्यांनीही शिवसेनेच्या नेत्यांवर पलटवार केला होता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या दुष्काळ निवारण उपसमितीचीही बैठक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांमधील उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल. शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीचाही आढावा यावेळी घेतला जाणार आहे. पिण्याचे आणि शेतीचे पाणी तसेच जनावरांचा चारा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाचे आदेश निघण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

आज आणखी एक महत्त्वाची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेला चर्चेसाठी निमंत्रण दिलं असून ही बैठक आज सायंकाळी 4.00 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे. किसान सभेचे पदाधिकारी थोड्याच वेळात बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेतून काल किसान सभेचा वाहन लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईकडे येत आहेत. त्यामुळे सरकारने या मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.

#मुंबई#PT24#Mumbai

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ