सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 114 | Moderate 09:22 IST

जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप, 500 कोटींच्या दाव्याने खळबळ

श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत 500 कोटी रुपये पोहोचल्याचा उल्लेख असलेली क्लिप मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवली; एकनाथ शिंदे यांनी आरोप फेटाळले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यात एक खळबळजनक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा उल्लेख आहे. याशिवाय भाजपकडून षडयंत्र रचलं जात आहे, असा दावाही जरांगे यांनी केला.

भर पत्रकार परिषदेत वाजवलेल्या या क्लिपमध्ये तीन ते चार जणांचे आवाज ऐकू येतात. त्यामुळे हे आवाज नेमके कुणाचे आहेत, यावर आता चर्चा रंगली आहे. क्लिपमध्ये ऐकू येणारी वाक्यं अशी आहेत: जरांगे पाटील यांना आधीच 500 करोड रुपये पोहोचले आहेत, श्रीकांत शिंदे यांच्या पासून पोहोचले आहेत. जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत आपल्या फायद्याचे ठरतील की नाही, याबद्दल माझं मत वेगळं आहे, कॅल्क्युलेशन वेगळं आहे. तुम्ही जे सोचता, जे तथ्य आहे ते तर आहेच, असंही त्यात म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना सवाल केले. शिंदेसाहेब, तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितलं, असं त्यांनी विचारलं. मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचेत, आणि तुम्ही भाजपकडून 500 कोटी घेऊन मला दिलेत, असं तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितलं का, असा प्रश्न त्यांनी केला. कारण ते नेते आता कुजबुज करायला लागले आहेत, असं ते म्हणाले. जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आहे, असं तुम्ही म्हणालात का, असंही त्यांनी विचारलं.

तुम्ही मला पाचशे कोटी रुपये दिले का, असं विचारून जरांगे म्हणाले की, जर दिले नसतील तर भाजप तुम्हाला संपवतोय का, की तुम्ही मला संपवताय, याचा छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. उद्या सकाळी मी मराठ्यांना 100 रुपये टाका असं सांगितलं, तर माझ्याकडे 2500 कोटी जमा होतील, असंही त्यांनी म्हटलं. हा लहान विषय नाही, शिंदेसाहेब, तुमचा माझा सामना 3 महिन्यांनंतर होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले. मी कुणालाही 500 कोटी दिले नाहीत, किंवा घेतले नाहीत, असं ते म्हणाले. जरांगे पाटलांनी शहानिशा करून बोलावं, असंही त्यांनी सांगितलं. जरांगे पाटील यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग दूध का दूध पानी का पानी होईल, असं म्हणत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.

या प्रकरणावर मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली. जरांगे यांनी सादर केलेली क्लिप खरी असेल, तर ही खूप गंभीर बाब आहे, असं ते म्हणाले. ही क्लिप कुणी व्हायरल केली, असा प्रश्न विचारून क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. क्लिपची चौकशी करा, त्यातल्या आवाजांची चौकशी करा, त्यानंतर दूध का दूध पानी का पानी होईल, असंही सामंत म्हणाले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ