५०० कोटींच्या आरोपानंतर जरांगे यांनी ऐकवली ऑडिओ क्लिप, सुषमा अंधारे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलणे
एकनाथ शिंदे यांच्यावरील ५०० कोटींच्या आरोपांवरून मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या नावांचा उल्लेख आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपये घेतल्याचे आरोप सध्या केले जात आहेत. या आरोपांवर शिंदे स्पष्टपणे बोलताना दिसले. मनोज जरांगे पाटील यांनी असा दावा केला आहे की, एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याचे भाजपला सांगितले आहे. नारायणगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना जरांगे पाटील यांनी हा आरोप केला.
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, ना ५०० कोटी घेतले ना ५०० कोटी दिले. नारायणगडावरील दसरा मेळाव्यात शिंदे यांनी या आरोपाला उत्तर दिले नाही. पण मुंबईतील दसरा मेळाव्यात शिंदे यांच्या शिवसैनिकांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे यांच्यावर शिंदे यांचे शिवसैनिक तुटून पडले. उदय सामंत यांनी थेट सांगितले की, जरांगे यांचा बोलवता धनी कोण आहे, याचे पुरावे ते शिंदे यांच्याकडे देणार आहेत.
त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी बॉम्ब फोडला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यात खळबळ उडवणारी ऑडिओ क्लिप सगळ्यांना ऐकून दाखवली. शिंदे गटाचे नेते मोठ्या प्रमाणात जरांगे यांच्यावर टीका करत असतानाच जरांगे यांनी ही ऑडिओ क्लिप दाखवली.
जरांगे यांनी ऐकवलेली ऑडिओ क्लिप खूप मोठी आहे. त्यात काही लोक एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या क्लिपमध्ये संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची नावे घेतली गेली. काही बातम्यांची उदाहरणेही दिली गेली. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत असताना संजय राऊत यांच्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याही नावाचा उल्लेख झाला.
सुषमा अंधारे यांचे नाव घेताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलले गेले. त्या क्लिपमध्ये म्हटले आहे की, अंधारे खूपच खालच्या लेव्हलला आहे, तिच्या नादाला लागायचे नाही. दुसरा व्यक्ती म्हणतो की, बरोबर आहे, त्यांच्या नादाला लागू नये पण. यावेळी क्लिपमध्ये काही लोक हसतानाही दिसत आहेत.
फक्त संजय राऊत यांच्याबद्दलच नाही, तर सुषमा अंधारे यांच्याबद्दलही त्या क्लिपमध्ये बोलले गेले. तिच्या नादी लागू नका, असे त्यांनी म्हटले. या ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठे वादळ आले आहे. ५०० कोटी कोणी घेतले, याचा विचार करा, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.