सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 160 | Moderate 12:13 IST

जरांगेंकडील क्लिपवरून भाजपचे आरोप हास्यास्पद, संजय राऊत यांचा पलटवार

क्लिप संजय राऊत यांनीच बनवली, या प्रसाद लाड यांच्या आरोपाला राऊत यांनी मीडियाशी बोलताना जोरदार उत्तर दिले.

जरांगेंकडील क्लिपवरून भाजपचे आरोप हास्यास्पद, संजय राऊत यांचा पलटवार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मनोज जरांगे यांच्याकडे असलेली क्लिप संजय राऊत यांनीच बनवली आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. उबाठाच्या वॉररुममध्ये ही क्लिप तयार झाली, त्यामुळे राऊत यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही लाड यांनी केली. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता पलटवार केला आहे. मीडियाशी बोलत असताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या लोकांना काही काम राहिलेले नाही, असे ते म्हणाले. त्या क्लिपमधले आवाज स्पष्ट ऐकू येत आहेत, तरीही हे लोक उगाचच काहीही बोलत आहेत, असे राऊत यांनी सांगितले. उद्या ते आणखी काहीही बोलतील, असेही ते म्हणाले. यांना पोरं झाली तर तीसुद्धा संजय राऊतांमुळेच झाली, म्हणून हे बोंब करतील, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

राऊत पुढे म्हणाले की, मी मनोज जरांगे यांचे आभार मानेन. त्यांनी एका मोठ्या प्रकरणाला वाचा फोडली आणि राजकारण्यांचा विद्रूप चेहरा देशासमोर आणला. त्यानंतर भाजपवाले जे बोलत आहेत, ते हास्यास्पद आहे आणि मूर्खपणाचे आहे. संजय राऊत यांनी ही टेप तयार केली, असे म्हणणे हेच हास्यास्पद आहे. लोक त्यांना हसत आहेत, पण ते त्यांना कळत नाही. उद्या ते काहीही बोलू शकतात. यांना पोरं झाली तरी म्हणतील की संजय राऊतांमुळे झाली. हे लोक या पातळीला पोहोचले आहेत, असे राऊत म्हणाले.

टेप कुणाची आणि आतले आवाज कुणाचे, हा प्रश्न बाजूला राहिला आहे. पण यांची अक्कल आणि बुद्धी या पातळीची आहे, असे राऊत यांनी म्हटले. त्यामुळे भाजपने त्यांच्या अकलेवर विसंबून राहणे म्हणजे माती आहे, असे ते म्हणाले. या लोकांना मेंदू नाही, हा मातीचा गोळा आहे. पैसा आणि सत्ता आहे म्हणून हा मातीचा गोळा वळवळतोय. दिल्लीतील त्यांच्या बड्या नेत्यांचाही मेंदू चालत नाहीये, अशी टीका राऊत यांनी केली.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून देशात वाद निर्माण झाला आहे. राऊत यांनी खरगे यांचे समर्थन केले. ग्रामीण भागात वडिलांना बाप किंवा म्हातारा म्हणतात, तुझा बाप कुठाय, तुझा म्हातारा कुठे आहे, असे विचारले जाते, असे त्यांनी सांगितले. पण भाजपला काही काम नाही. खरगे यांनी अनेक वर्षे उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत, असेही ते म्हणाले.

रस्त्यावर उतरल्याने सहानुभूती मिळेल, असे भाजपला वाटत असेल, पण तसे काही होणार नाही, असे राऊत यांनी म्हटले. या सरकारचा बाप सुद्धा सत्तेतून जाईल, असे ते म्हणाले. पंतप्रधानांचा बाप कोणी काढत नाही. मोदींना सवय आहे, माझी आई काढली, बाप काढला, असे म्हणण्याची. लहान मुलांसारखे भोकाड पसरायची आणि छाती बडवण्याची त्यांना सवय आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. कोणी कुणाचा बाप काढत नसते. सरकारचा बाप जाईल, असे म्हटले जाते. त्यामुळे कुणी कुणाचा बाप काढत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ