शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:17 IST

रेल्वे रद्द असतानाही सीजेपीचे अभिजीत दीपके ट्रेनने दिल्लीकडे रवाना; सरकारला सवाल

कॉकरोच जनता पार्टीच्या उद्याच्या आंदोलनासाठी अभिजीत दीपके आणि दोन प्रवक्ते दिल्लीला निघाले असून, गाड्या आणि मेट्रो बंद करण्यावरून त्यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारले.

रेल्वे रद्द असतानाही सीजेपीचे अभिजीत दीपके ट्रेनने दिल्लीकडे रवाना; सरकारला सवाल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) उद्या, 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या रस्त्यांवरही कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तरीही सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके आणि पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका व सौरव दास ट्रेनने दिल्लीला निघाल्याची माहिती आहे. जाताना माध्यमांशी बोलताना दीपके यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दीपके यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला. ते म्हणाले, "तुम्हाला एवढी भीती कशाची वाटते? जर एवढी भीती वाटत असेल तर आख्खा देश बंद करून टाका, मला हसू येतंय. दिल्ली ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? आंदोलनामुळे त्रास होतो म्हणून तुम्ही मेट्रो बंद करता, रेल्वे बंद करता, आता रस्तेही बंद करून टाकले. आता सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही का?"

अटकेच्या मुद्द्यावरही दीपके बोलले. "तुम्ही किती जणांना अटक करणार? मला अटक करा. सौरव दास, आशुतोष रांका तयार आहेत. आम्हाला अटक करा," असे ते म्हणाले. तुमच्याकडे परवानगी आहे का, असा प्रश्न विचारला गेला तर ज्ञानेश कुमार यांनी 13 कोटी मतं डिलीट करताना परवानगी मागितली होती का आणि फॉर्म 6 मध्ये बदल करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली होती का, असे त्यांनी विचारल्याचे सांगितले जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्ञानेश कुमार यांनी १३ कोटी मते कोणालाही न विचारता डिलीट केली, मग त्यांच्याविरोधात आंदोलन करायला परवानगी मागण्याची गरज आहे का, असाही सवाल त्यांनी केला. संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार आम्हाला आंदोलनाची परवानगी मिळालेली आहे आणि जंतर-मंतर हे आंदोलनाचे अधिकृत ठिकाण आहे, असेही दीपके यांनी म्हटले.

त्यांनी पुढे असा दावा केला की, "सरकार घाबरले असल्याने त्यांनी रेल्वे बंद केल्या आहेत, हुकूमशहा घाबरला आहे. सरकार गंभीर आहे म्हणूनच त्यांनी मेट्रो, रेल्वे बंद केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी रोज ब्लड प्रेशर चेक केले पाहिजे. त्यांना सीजेपीच्या आंदोलनाची भीती वाटत आहे. ज्ञानेश कुमार इतका महत्त्वाचा का आहे? राजाचा जीव पोपटात आहे आणि तो पोपट ज्ञानेश कुमार आहे. त्याला पकडले तर राजालाही जावे लागेल."

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (DMRC) राजधानीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे बंद करायला सांगितले आहे. काही ठिकाणी गाड्यांची वारंवारता कमी करण्याचेही सांगण्यात आले आहे. ही प्रस्तावित व्यवस्था शुक्रवारी रात्री ९ वाजता सुरू होऊ शकते आणि १० ऑक्टोबर रोजी परिस्थिती सामान्य होईपर्यंत चालू राहील. बंद होणाऱ्या स्थानकांच्या यादीत राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट, पटेल चौक, जनपथ, नवी दिल्ली, मंडी हाऊस, आयटीओ आणि काश्मिरी गेट या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.

रेल्वेनेही १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही स्थानकांच्या आसपास मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचे कारण रेल्वेने दिले आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ