शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:09 IST

ज्ञानेश कुमार यांनी पद सोडावे, चंद्रपुरात काँग्रेसच्या मोर्चात मागणी

गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा 'वोट बचाओ' मोर्चा निघाला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ज्ञानेश कुमार यांनी पद सोडावे, चंद्रपुरात काँग्रेसच्या मोर्चात मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपुरात गुरुवारी काँग्रेसने 'चंद्रपूर वोट बचाओ मोर्चा' काढला. गांधी चौकापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

'लोकतंत्र बचाओ सप्ताह' अंतर्गत 'वोट बचाओ - देश बचाओ' हे जनआंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून चंद्रपूर येथील ऐतिहासिक गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांनी केले. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत उपस्थितांशी बोलताना त्यांनी ही मागणी मांडली.

धानोरकर म्हणाल्या, "'वोट बचाओ - देश बचाओ' हा केवळ एक नारा नसून सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी पुकारलेला लढा आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून ती नागरिकांच्या अधिकारांशी आणि संविधानिक मूल्यांशी जोडलेली व्यवस्था आहे. मतदारांचा अधिकार सुरक्षित राहणे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण होणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत राहील."

या सभेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनीही मनोगत मांडले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी त्यांचे नेते राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, काँग्रेस पक्ष आणि 'इंडिया' आघाडी सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत, असे धोटे म्हणाले. नागरिकांनीही आपल्या अधिकारांबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

जाहीर सभा संपल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. या शिष्टमंडळाने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुजी यांच्या नावे निवेदन सादर केले. त्यात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह इतर विविध प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात आमदार ॲड. अभिजित वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, संतोष लहामगे, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, महिला काँग्रेस शहर अध्यक्षा चांदाताई वैरागडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी महापौर संगीता अमृतकर, गटनेते सुरेंद्र अडबाले, नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख आणि युवक काँग्रेसचे सौरभ टिपले यांच्यासह प्रमोद बोरीकर, दिपक वाढई, उमाकांत धांडे, सपना मोरे, पवन भगत, सुनीता गोवर्धन, राजु रेड्डी, दिनेश चोखारे, प्रमोद चौधरी, अनिल नरुले, रंजन लांडे, गोविंदा उपरे, निर्मला कुडमेथे, नरेश गुलप्ल्ली, मंगेश बावणे, अभिजीत गोंगले आणि आशिष बोंडे हेही उपस्थित होते. काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ