मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:47 IST

डॉल्बीसाठी गणेश मंडळांचा हट्ट; विसर्जन न करण्याचा प्रशासनाला इशारा

बीडमध्ये प्रशासनाने डॉल्बी साऊंड सिस्टीमवर बंदी घातल्याने गणेश मंडळांनी विसर्जन न करण्याची थेट धमकी दिली आहे.

डॉल्बीसाठी गणेश मंडळांचा हट्ट; विसर्जन न करण्याचा प्रशासनाला इशारा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

आज अनंत चतुर्दशी असल्याने गणेश भक्त मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुका काढत आहेत. या मिरवणुकींमध्ये ढोल-ताशे, डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजवण्याची पद्धत आहे. मुंबई आणि पुण्यात डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीम सर्रास वाजवले जातात, याच कारणावरून बीडमधील सार्वजनिक गणेश मंडळांनीही डॉल्बी साऊंड सिस्टीमची मागणी केली आहे.

बीडमध्ये प्रशासनाने यंदा डॉल्बी साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या निर्णयाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक विरोध केला असून, डॉल्बी वाजवायला परवानगी दिली नाही तर बाप्पाचे विसर्जन करणार नाही, अशी थेट धमकीच त्यांनी प्रशासनाला दिली आहे.

बीड जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यामुळे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने यंदा डीजे आणि साऊंड सिस्टीमवर संपूर्ण बंदी घातली आहे. हा आदेश केवळ गणेश विसर्जनापुरता मर्यादित नाही, तर लग्न समारंभ आणि इतर शुभकार्यांसाठीही तो लागू करण्यात आला आहे, म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात परवाना नसताना डीजे किंवा डॉल्बी वाजवल्यास थेट पोलिस कारवाई केली जाणार आहे.

याचे एक उदाहरण म्हणजे धानोरा रोडवरील एका लॉन्सवर सुरू असलेल्या लग्नकार्यात डीजे वाजवल्यामुळे पोलिसांनी तिथली संपूर्ण साऊंड सिस्टीम जप्त केली. याशिवाय जनरेटरसाठी वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार करणाऱ्यांवरही प्रशासन कडक कारवाई करणार आहे.

बीडमधील गणेश मंडळे डॉल्बी साऊंडसाठी आक्रमक झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मुंबई-पुण्यासह संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये जशी डॉल्बी साऊंडला परवानगी देण्यात आली, तशीच परवानगी आम्हालाही द्यावी, अशी मागणी बीडमधील मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तब्बल १५ ते २० मंडळांनी डॉल्बी साऊंडची मागणी केली असून, या सर्व मंडळांनी बीडच्या हिरालाल चौकात रस्ता अडवून ठिय्या मांडला आहे.

बीड प्रशासन आणि पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास पूर्णपणे बंदी घातली असून, हे नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील १७५९ मंडळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, यासाठी ४००० पेक्षा अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मिरवणुकींवर बारीक नजर ठेवण्यासाठी एआय ड्रोन आणि हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही वापर केला जात आहे.

पोलिसांनी नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्याचे आवाहन केले असून, मिरवणुकांमध्ये हलगी, ढोल-ताशा, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरातच बाप्पाला निरोप देण्याचे निर्देश दिले आहेत.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ