बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

संभाजीनगरच्या कॉलेजांत डेटा अॅनालिटिक्स व जनरेटिव्ह एआयवर चर्चासत्र

नीड डेटाचे पुष्पराजसिंह राठोड यांनी विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञान विश्वासाने आत्मसात करण्याचे आवाहन केले.

संभाजीनगरच्या कॉलेजांत डेटा अॅनालिटिक्स व जनरेटिव्ह एआयवर चर्चासत्र छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात संगणकीय कौशल्ये शिकून घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. संगणक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञान विश्वासाने आत्मसात करावे, असे आवाहन नीड डाटाचे प्रशिक्षक पुष्पराजसिंह राठोड यांनी केले.

छत्रपती संभाजी नगर येथील सुप्रियाताई सुळे कॉलेज ऑफ मैनेजमेंट सायन्स, हसूल आणि मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी यांनी संयुक्तपणे शनिवारी हा कार्यक्रम घेतला. 'सेमिनार ऑन डेटा अॅनालिटिक्स विथ जनरेटिव्ह एआय' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात राठोड बोलत होते. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून 'नीड डेटा'चे संस्थापक पुष्पराज सिंह राठोड उपस्थित होते.

देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, प्रा. अर्जुन राठोड आणि प्रा. राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा परिसंवाद झाला. प्राचार्य डॉ. कृष्णा कांबळे यांनी डेटा अॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआय या आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे अधोरेखित केले.

प्रमुख वक्ते पुष्पराज सिंह राठोड यांनी डेटा अॅनालिटिक्सच्या मदतीने मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण कसे करता येते आणि त्यातून योग्य निर्णय कसे घेता येतात, हे समजावून सांगितले. जनरेटिव्ह एआयच्या साहाय्याने मजकूर, चित्रे आणि अनेक प्रकारची डिजिटल सामग्री तयार करता येते, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण, व्यवसाय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. अस्मिता साळवे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊन नवी कौशल्ये आत्मसात करावीत, तंत्रज्ञानाचा वापर सर्जनशीलतेने आणि जबाबदारीने करावा, तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटीचे प्राचार्य डॉ. नामदेव सानप होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि नावीन्यपूर्ण विचारसरणी विकसित करण्याची गरज आहे, असे त्यांनी मांडले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. हर्षद वाघमारे, प्रा. संतोष प्रधान, प्रा. ज्योती मोरे, प्रा. राजेंद्र भगत, प्रा. डॉ. प्रज्ञा किंवंडे, प्रा. तुबा सय्यद, प्रा. अनिकेत दंडाळे, प्रा. ऋषिकेश राजपूत, प्रा. गौरव अस्तुरे तसेच श्री. मिथुन खाडे आणि विशाल बोर्ड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अनघा भोर यांनी केले, तर संकेत गाडेकर यांनी आभार मानले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ