मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:30 IST

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरण: युवक काँग्रेसची प्राध्यापकांवर कारवाईची मागणी, राहुल गांधींचा पालकांना फोन

IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून दोन प्राध्यापकांवर अटकेची मागणी केली आहे.

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरण: युवक काँग्रेसची प्राध्यापकांवर कारवाईची मागणी, राहुल गांधींचा पालकांना फोन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

IIT मुंबईत शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणावरून युवक काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. संस्थेतील प्राध्यापकांनी साहिलचा जातीवरून आणि मानसिक पातळीवर छळ केला, त्यामुळेच त्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. साहिलवर बिनबुडाचे आरोप लावले गेले आणि यातूनच तो इतका खचला, असंही पक्षाचं म्हणणं आहे.

गांधी भवन इथे झालेल्या पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी थेट प्रा. सत्यनारायण दुल्ला यांच्यावर बोट दाखवलं. साहिलच्या आत्महत्येला हेच प्राध्यापक जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी दुल्ला यांना तातडीने अटक करावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली. या प्रकरणात प्रा. केदारे यांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगत त्यांनाही अटक करण्याची मागणी चिब यांनी केली. दोन्ही प्राध्यापकांना अटक होत नाही तोपर्यंत निष्पक्ष चौकशी शक्यच नाही, कारण संस्थाच स्वतःच्या घटनेची चौकशी करणार असेल तर ती निष्पक्ष कशी होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

साहिलच्या आधीही या संस्थेत विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं चिब यांनी सांगितलं. मागच्या सात महिन्यांत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. साहिलचा लॅपटॉप, मोबाईल आणि इतर सगळी गॅझेट्स सध्या क्राईम ब्रँचच्या ताब्यात आहेत, त्यातला डेटा तातडीने पालकांना द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. साहिलला न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा थांबणार नाही, असं उदय भानू यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी साहिलच्या पालकांशी फोनवरून बोलून त्यांचं सांत्वन केलं. साहिलला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष त्याच्यासाठी लढत राहील, असं आश्वासन गांधी यांनी दिल्याचं चिब यांनी सांगितलं.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यावेळी म्हणाल्या की, साहिल खूप हुशार विद्यार्थी होता आणि त्याच्यावर कॉपी केल्याचा आरोप बिनबुडाचा आहे, कारण पहिल्या बेंचवर बसणारा विद्यार्थी कॉपी कसा करू शकेल. संस्थेने कोणतीही चौकशी न करता आधी आरोप केला आणि नंतर तो मागे घेत माफीही मागितली, असं त्यांनी सांगितलं. आयआयटी पवईमध्ये जातीवरून छळ होत असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थी करत आहेत, पण आता त्यांना बोलू दिलं जात नाही, करिअर खराब करण्याची धमकी दिली जाते, त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि कॅम्पसच्या बाहेरही जाऊ दिलं जात नाही, असा आरोप शबरीन यांनी केला. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे हेदेखील उपस्थित होते. यानंतर उदय भानू चिब यांच्यासह युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईचे सहपोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ