बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
02:40  नागपूर पदवीधर निवडणूक: निकाल बुधवारी सकाळपर्यंत लांबणार, वंजारी कोहलेंच्या पुढे 02:00  नागपुरात भरदुपारी भूकंपाचे धक्के, केंद्रबिंदू जमिनीखाली फक्त ८ किलोमीटरवर 01:00  पदवीधर मतमोजणी: टपाली मतांत काँग्रेसचे वंजारी भाजपच्या कोहळेंपेक्षा १५ मतांनी पुढे 27 ऑक्ट | 23:00  नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर, अमरावती शिक्षकमध्ये शिंदे शिवसेनेचे किरण सरनाईक पुढे 27 ऑक्ट | 18:40  नागपूर पदवीधर मतमोजणी दुसऱ्या दिवसापर्यंत लांबण्याची शक्यता, पहिल्याच दिवशी 34 टपाली मतपत्रिका अवैध 15:57  नागपूर पदवीधर मतमोजणीत सुधाकर कोहळे 4,244 मतांनी आघाडीवर; दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल
सर्व थेट अपडेट

नागपूर पदवीधर मतमोजणीत सुधाकर कोहळे 4,244 मतांनी आघाडीवर; दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल

नागपूर पदवीधर मतमोजणीत सुधाकर कोहळे 4,244 मतांनी आघाडीवर; दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

गेल्या 30 तासांपासून सुरू असलेल्या मोजणीत भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात चुरस कायम आहे. कोणत्याच उमेदवाराचा कोटा पूर्ण न झाल्याने निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांवर ठरणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गेल्या 30 तासांपासून सुरू आहे आणि अंतिम टप्प्यातही दोन्ही बाजूंमधली रस्सीखेच कायम आहे. मोजणीदरम्यान पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे.

आतापर्यंतच्या मोजणीनुसार भाजपचे सुधाकर कोहळे यांना 61,029 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना 56,785 मते मिळाली आहेत. त्यामुळे कोहळे सध्या 4,244 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

कोहळे यांच्यासह कोणत्याच उमेदवाराचा विजयाचा कोटा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीचा निकाल आता बाद फेरीत दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांनुसार लागणार आहे. सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीसह ही बाद फेरी सुरू आहे. या फेरीत 28 उमेदवार बाद करण्यात आले आहेत आणि त्यानंतर प्रमुख उमेदवारांना वर सांगितलेली मते मिळाली आहेत.

याच मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नितेश कराळे 24249 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या मतांपैकी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची किती मते मिळतात, हाच मुद्दा नागपूरच्या या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कराळे हे गेमचेंजर ठरत आहेत, असे मतमोजणीच्या चित्रावरून बोलले जात आहे.

दरम्यान, भाजपचे बंडखोर अनिल सोले यांच्या मतांच्या मोजणीतही रंजक आकडे समोर आले. सोले यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती आणि भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा दिला होता. त्यांना पहिल्या पसंतीची 267 आणि पोस्टल बॅलेटमधली 7 अशी एकूण 274 मते मिळाली होती.

या 274 मतांमधली दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यात कोहळे यांना 88 मते मिळाली, वंजारी यांना 41 मते मिळाली आणि नितेश कराळे यांना 10 मते मिळाली. म्हणजेच सोले यांच्या मतांमधून दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते भाजपचे उमेदवार कोहळे यांना मिळाली असली, तरी सोले यांच्या मतदारांनी वंजारी यांनाही दुसरी पसंती दिली आहे.

एकूण पाहता, कोहळे आघाडीवर आहेत आणि कोहळे व वंजारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. नेमका कोण विजयी गुलाल उधळणार, हे आता थोड्याच वेळात कळेल, अशी शक्यता आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ