मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 20:29 IST

नागपूर पदवीधर निवडणुकीविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे निर्देश; याचिकेत सुधारणा करा, पुढची सुनावणी दोन

नागपूर पदवीधर निवडणुकीविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे निर्देश; याचिकेत सुधारणा करा, पुढची सुनावणी दोन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर खंडपीठाने आता काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, असे खंडपीठाने सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढची सुनावणी दोन नोव्हेंबर रोजी होणार असल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणातील याचिकाकर्ते सचिन काळबांडे यांनी मुळात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नियमानुसार वेळेत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही, असा त्यांचा आरोप होता. म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ही यादी प्रसिद्ध व्हायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर अखेरच्या दिवशी एक गठ्ठा नावे नोंदवण्यात आली, असा आरोप करून त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता.

याशिवाय मतदार यादीत मोठ्या संख्येने दुबार मतदारांची नावे असल्याचा दावाही काळबांडे यांनी केला आहे. पदवीधर नसतानाही काही पदविका आणि डिप्लोमा असलेले मतदार यादीत पात्र ठरले, हा मुद्दाही त्यांनी याचिकेतून उपस्थित केला होता. या अतिरिक्त मुद्द्यांच्या संदर्भात याचिकाकर्त्याने याचिकेत आवश्यक ती सुधारणा करावी आणि ती दोन नोव्हेंबरला होणाऱ्या पुढच्या सुनावणीच्या वेळी खंडपीठासमोर सादर करावी, असे नागपूर खंडपीठाने सांगितले आहे.

दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक यंत्रणा यांनाही खंडपीठाने निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर त्यांनी आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात पुढच्या सुनावणीत सादर करावे, असे खंडपीठाने सांगितले आहे. दोन नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावांसमोर पसंतीक्रम 1 असा क्रमांक लिहिण्याऐवजी टिकमार्क (yes) केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मतदानात अवैध मतांचा आकडा मोठा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तिकडे अमरावती शिक्षक निवडणुकीच्या मतमोजणीची पूर्वतयारी सुरू आहे. त्यात 25-25 मतपत्रिकांच्या दुसऱ्या फेरीचे गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली असून त्यात 14 मतपेट्यांमधील मतपत्रिका काढून त्यांचे गठ्ठे लावले जाणार आहेत. एकूण सहा फेऱ्या होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ