बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
02:40  नागपूर पदवीधर निवडणूक: निकाल बुधवारी सकाळपर्यंत लांबणार, वंजारी कोहलेंच्या पुढे 02:00  नागपुरात भरदुपारी भूकंपाचे धक्के, केंद्रबिंदू जमिनीखाली फक्त ८ किलोमीटरवर 01:00  पदवीधर मतमोजणी: टपाली मतांत काँग्रेसचे वंजारी भाजपच्या कोहळेंपेक्षा १५ मतांनी पुढे 27 ऑक्ट | 23:00  नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर, अमरावती शिक्षकमध्ये शिंदे शिवसेनेचे किरण सरनाईक पुढे 27 ऑक्ट | 18:40  नागपूर पदवीधर मतमोजणी दुसऱ्या दिवसापर्यंत लांबण्याची शक्यता, पहिल्याच दिवशी 34 टपाली मतपत्रिका अवैध 09:39  विधान परिषदेच्या पाच जागांची मतमोजणी: रात्री उशिरापर्यंत नागपूर, पुण्यासह सर्वत्र अटीतटी
सर्व थेट अपडेट

नागपूर पदवीधर निवडणूक: 15 हजार 106 मते अवैध, कोहळेंच्या नावासमोर 2 आकडा लिहिल्याने सुमारे तीन हजार मते बाद

नागपूर पदवीधर निवडणूक: 15 हजार 106 मते अवैध, कोहळेंच्या नावासमोर 2 आकडा लिहिल्याने सुमारे तीन हजार मते बाद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात झालेल्या 1 लाख 65 हजार 541 मतांपैकी 15 हजार 106 मते अवैध ठरली असून, निकाल आता नितेश कराळे यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून आहे.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 1 लाख 65 हजार 541 मतदान झाले. त्यापैकी तब्बल 15 हजार 106 मते अवैध ठरली आहेत. पदवीधरांच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मते अवैध ठरणे लक्षवेधी ठरले आहे.

त्याहूनही लक्षवेधी बाब म्हणजे भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांच्या नावासमोर अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर फक्त 2 हा आकडा लिहिला. पहिल्या पसंतीसाठी त्यांच्या नावासमोर 1 लिहिणे अपेक्षित असते. मिळालेल्या माहितीप्रमाणे, अशा मतपत्रिकांमुळे सुमारे तीन हजार मते अवैध ठरली आहेत. कोहळे यांना मिळू शकणारे हक्काचे मतदान त्यामुळे बाद झाले. हे मतदान त्यांना मिळाले असते, तर त्यांची आघाडी वाढली असती.

एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांनी कोहळे यांच्या नावासमोर 1 ऐवजी 2 लिहिल्याने त्यांच्या आघाडीला फटका बसलाच, शिवाय ही कृती विशिष्ट मतदारांच्या गटाने ठरवून केली आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीच्या दोन्ही फेऱ्यांनंतर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली. नियमाप्रमाणे त्यामुळे विजयासाठी 75 हजार 438 मतांचा कोटा ठरला आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांपैकी कोणालाही एवढी मते मिळवता आली नाहीत. म्हणून आता बाद फेरी सुरू झाली असून दुसऱ्या पसंतीची मते मोजायला सुरुवात झाली आहे.

सध्याच्या स्थितीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते मिळून सुधाकर कोहळे यांना 60,945 मते आहेत, तर अभिजीत वंजारी यांना 56,665 मते मिळाली आहेत. कोहळे सध्या 4280 मतांनी पुढे आहेत. तळाचे उमेदवार एकामागून एक बाद केले जात आहेत आणि आतापर्यंत 16 उमेदवार बाद झाले आहेत. या उमेदवारांच्या मतांमध्ये वंजारी यांना कोहळे यांच्यापेक्षा थोडी जास्त मते मिळाली, पण त्यामुळे कोहळे यांची एकूण आघाडी फारशी कमी झालेली नाही. 16 उमेदवार बाद झाल्यानंतरही कोहळे यांची आघाडी 4280 मतांचीच आहे.

तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितेश कराळे यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांवर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. थोड्या वेळाने कराळे यांच्या 24 हजार 249 मतांमधील दुसऱ्या पसंतीची मते मोजायला सुरुवात होईल. ही मते अभिजीत वंजारी यांना जास्त मिळतात की सुधाकर कोहळे यांना, यावरच नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल ठरणार आहे. कराळे यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीची मते कोणाला बळ देतात, यावर भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निश्चित होईल.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ