बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:54 IST

मेरठमध्ये रस्त्यावर खेळणाऱ्या दोन चिमुरड्यांच्या अंगावरून भरधाव कार, सीसीटीव्हीत कैद झाली घटना

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये रस्त्यावर खेळणाऱ्या दोन लहान मुलांना भरधाव कारने धडक दिली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मेरठमध्ये रस्त्यावर खेळणाऱ्या दोन चिमुरड्यांच्या अंगावरून भरधाव कार, सीसीटीव्हीत कैद झाली घटना छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये रस्त्यावर खेळत असलेल्या दोन लहान मुलांच्या अंगावरून भरधाव कार गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही सगळी घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भीषण आहेत की ती पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. काही क्षणांतच घडलेल्या या प्रकाराने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

फुटेजमध्ये एका लहान रस्त्याच्या कडेला दोन मुले खेळताना दिसतात. त्याच वेळी बाजूने एक सायकल पुढे निघून जाते आणि त्यानंतर एक चारचाकी तिथे येते. समोर दोन मुले खेळत आहेत, याची कल्पना कदाचित कारचालकाला आली नसावी. त्यामुळे कोणताही विचार न करता तो आपली कार भरधाव पुढे नेतो आणि दोन्ही चिमुरडी या अपघाताला बळी पडतात.

खेळात गुंग असलेली दोन्ही मुले कारला धडकून गाडीखाली येतात. त्या वेळी मोठा आवाज होतो आणि काहीतरी गडबड झाली आहे, याची जाणीव चालकाला होते. आरडाओरड ऐकून जवळचे लोक आणि मुलांचे नातेवाईक घाबरून मदतीसाठी धावत येतात. गाडी जागीच थांबलेली असते. स्थानिक लोक मुलांना गाडीखालून बाहेर काढतात आणि त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करतात.

या घटनेत कारचालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले, तरी सध्या त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर अनेक यूजर्सनी कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या घटनेत चालकाला, तर काहींनी पालकांना दोषी ठरवले आहे. एका यूजरने म्हटले, "अरे बापरे, पण कारचालकाला मुले दिसली कशी नाहीत". दुसऱ्या यूजरने लिहिले, "कारचालकाचे डोळे काय फुटले होते, नशा करुन तो गाडी तर चालत नव्हता". आणखी एका यूजरने लिहिले, "पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवं".

अशा प्रकारे काही क्षणांतच घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांनी या दृश्यांवर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ