बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:55 IST

कोकणात उकाडा, तर मध्य महाराष्ट्रात पाऊस: 15 ते 17 ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट जाहीर

हवामान विभागाने 15 आणि 16 ऑक्टोबरसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्णता आणि पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

कोकणात उकाडा, तर मध्य महाराष्ट्रात पाऊस: 15 ते 17 ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट जाहीर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यात सध्या हवामानात विचित्र बदल दिसत आहेत. कोकण आणि किनारपट्टी भागात उकाडा आणि उष्णतेची लाट लोकांना हैराण करत आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी उष्णता आणि पावसाचा 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.

15 ऑक्टोबर रोजी कोकण-गोवा विभागातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याच दिवशी दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. दक्षिण कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात मात्र हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

विभागवार पाहिले तर 15 तारखेला कोकणात उष्ण आणि दमट हवामानासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

16 ऑक्टोबर रोजी उष्णतेच्या यलो अलर्टचा प्रभाव काहीसा कमी होऊन तो ठाणे, मुंबई आणि रायगडपुरता मर्यादित राहील. मात्र पावसाच्या यलो अलर्टमध्ये वाढ करण्यात आली आहे. या दिवशी सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

16 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. कोकणात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

17 ऑक्टोबर रोजीही हाच कल कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडू शकतो. विदर्भातही काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ