बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:02 IST

दिवाळीसाठी बोटची 'अपग्रेड टू बोट' मोहीम; रवी किशन, श्रेया कालरा, सूफी मोतीवाला झळकणार

भारतातील आघाडीचा ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड बोटने दिवाळीनिमित्त नवीन मोहीम सुरू केली असून, उत्पादनांवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.

भारतातील आघाडीचा ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड असलेल्या बोटने (boAt) दिवाळीनिमित्त 'अपग्रेड टू बोट' ही नवी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अभिनेते रवी किशन, क्रिएटर श्रेया कालरा आणि सूफी मोतीवाला सहभागी झाले आहेत. दिवाळीच्या काळात ग्राहकांनी रोजच्या वापरातील तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादने अपग्रेड करावीत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

'आजूबाजूचे लोक टीका करण्याआधी तुमची ऑडिओ उत्पादने अपग्रेड करा' या संकल्पनेवर ही मोहीम आधारलेली आहे. सणासुदीचे आणि रोजच्या जीवनातले ओळखीचे प्रसंग दाखवून, योग्य तंत्रज्ञानामुळे संगीत ऐकण्याचा, घरच्या घरी मनोरंजनाचा आणि खास क्षण साजरे करण्याचा अनुभव कसा अधिक चांगला होऊ शकतो, हे यात मांडले आहे.

दिवाळीत ग्राहक घराची सजावट, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य देतात. मात्र रोजच्या वापरातील ऑडिओ आणि इतर तंत्रज्ञान उपकरणांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. बोटने 'फेस्टिव्ह मिसमॅच' या संकल्पनेतून हलक्याफुलक्या शैलीत हेच अधोरेखित केले आहे की, सणाच्या तयारीत केवळ घर आणि पेहराव नव्हे, तर मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटीशी संबंधित उत्पादने अपग्रेड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मोहिमेतील तीन डिजिटल चित्रफितींमधून ही संकल्पना वेगवेगळ्या प्रसंगांतून मांडली आहे. रवी किशन एका कार्यालयीन प्रसंगात दिसतात, जिथे वेगवेगळ्या मतांमुळे साध्या संभाषणाचे रूपांतर विनोदी गोंधळात होते आणि बोटचे उत्पादन परिस्थिती हाताळण्यास मदत करते. श्रेया कालरा यांच्या चित्रफितीत दिवाळीच्या पार्टीत खराब आवाजामुळे बिघडणारा माहोल बोटचे स्पीकर्स कसा सुधारतात, हे दाखवले आहे. सूफी मोतीवाला घरात मित्र-परिवारासोबत वेळ घालवताना उत्तम ध्वनी गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करतात.

बोटच्या प्रवक्त्याने सांगितले की, "सणासुदीचा काळ ग्राहकांसाठी दैनंदिन वापरातील तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादनांचे पुनर्मूल्यांकन आणि अपग्रेड करण्याची महत्त्वाची संधी असते. 'अपग्रेड टू बोट'च्या माध्यमातून आम्हाला ही संकल्पना सहज आणि मनोरंजक पद्धतीने मांडायची होती. सणासुदीच्या काळात प्रत्येकाचे स्वतःचे मत असते; मात्र, योग्य तंत्रज्ञान अनुभव अधिक चांगला बनवू शकते."

प्रवक्त्याने पुढे सांगितले की, "रवी किशन, श्रेया कालरा आणि सूफी मोतीवाला यांच्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मांडत आहोत. त्याचबरोबर, ऑडिओ, होम एंटरटेनमेंट, स्मार्टवॉच आणि पॉवर बँक यांसह आमच्या विस्तृत उत्पादन श्रेणीची ओळखही या मोहिमेतून करून दिली जात आहे."

वैयक्तिक ऑडिओ श्रेणीत रॉकरझ ६५० प्रो, एअरडॉप्स प्राइम ८००डी, निर्वाणा झेनिथ प्रो आणि निर्वाणा यूटोपिया २ एएनसी ही उत्पादने समाविष्ट आहेत. त्यांत ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि स्पेशियल ऑडिओ ही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

होम एंटरटेनमेंट श्रेणीत अवांते प्राइम एक्स, अवांते प्राइम ५०००डीए साउंडबार आणि पार्टीपाल ६५० हे पर्याय आहेत, जे चित्रपट आणि कौटुंबिक कार्यक्रमांचा आनंद द्विगुणीत करतात. स्मार्टवॉचमध्ये क्रोम सीरिज (आयरिस, आयव्हरी, ईऑन, होरायझन), अल्टिमा वोग २, स्टॉर्म कॉल ४ आणि सेलर नॅव्ह यांचा समावेश आहे. प्रवास आणि खरेदीदरम्यान चार्जिंगची गरज भागवण्यासाठी एपेक्स पॉवर बँक सीरिज (पीबी४००, पीबी ४००प्रो, पीबी ४४५, पीबी ३३२) सादर करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत बोटच्या या सर्व उत्पादनांवर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळासह फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ