गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:33 IST

दिवाळीत 5 लाखांच्या आत नवी कार हवी? एस-प्रेसोपासून सी३एक्सपर्यंत पाच पर्याय

दिवाळीच्या खरेदीत 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या पाच गाड्यांची माहिती, ऑटोमॅटिक आणि सीएनजी पर्यायांसह.

दिवाळीत 5 लाखांच्या आत नवी कार हवी? एस-प्रेसोपासून सी३एक्सपर्यंत पाच पर्याय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दिवाळी जवळ आली आहे आणि बाजारात खरेदीची मोठी लगबग दिसत आहे. सणासुदीच्या काळात नवी कार घेऊन ती दारात उभी करायचे स्वप्न अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे पाहतात. यंदा तुम्हीही कार घ्यायचा विचार करत असाल आणि बजेटची काळजी वाटत असेल, तर भारतीय बाजारात 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत पाच चांगले पर्याय आहेत. यात छोट्या हॅचबॅकपासून थोड्या मोठ्या आणि आकर्षक डिझाईनच्या गाड्यांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे.

पहिली गाडी मारुती एस-प्रेसो (Maruti S-Presso). हिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.50 लाख रुपये आहे. 5 लाखांच्या बजेटमध्ये या गाडीचे तब्बल 6 व्हेरियंट्स मिळतात. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हवा असेल तर VXi (O) AMT प्रकार 4.77 लाख रुपयांत आहे. यात 1.0-लीटर पेट्रोल इंजिन असून ते 68 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क देते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्ससह येते. सीएनजी मॉडेलमध्ये तेच इंजिन सीएनजी मोडवर 56 PS पॉवर आणि 82 Nm टॉर्क देते आणि त्याला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडलेला आहे.

दुसरी गाडी टाटा टियागो (Tata Tiago). सुरक्षेच्या बाबतीत ही गाडी अव्वल मानली जाते. या बजेटमध्ये तिचा 'स्मार्ट' हा बेस व्हेरियंट बसतो, ज्याची एक्स-शोरूम किंमत 4.77 लाख रुपये आहे. Tiago Smart मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन असून ते 85 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क देते. त्याला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडला आहे. बेस व्हेरियंट असूनही कंपनीने सुरक्षेत तडजोड केलेली नाही. यात 6 एअरबॅग्स, EBD सह ABS, मागचे पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX चाइल्ड सीट माऊंट्स आहेत. डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि मॅन्युअल एसी हेही फिचर्स मिळतात. टियागोमध्ये सीएनजी आणि एएमटी पर्याय आहेत, पण त्यासाठी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त बजेट लागेल.

तिसरी गाडी मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10). भारतीय कुटुंबांची आवडती मानली जाणाऱ्या या गाडीची किंमत 3.70 लाख रुपयांपासून सुरू होते. 5 लाखांच्या बजेटमध्ये पेट्रोल, सीएनजी आणि ऑटोमॅटिक असे अनेक पर्याय आहेत. 5 लाखांच्या आत ऑटोमॅटिक कार हवी असेल तर VXi (O) AMT व्हेरियंट खास आहे, त्याची किंमत 4.97 लाख रुपये आहे. या गाडीतही 1-लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे.

चौथी गाडी रेनॉल्ट क्विड (Renault Kwid). हिचे दोन व्हेरियंट्स 5 लाखांच्या बजेटमध्ये येतात. एसयूव्हीसारखा मस्क्युलर लुक हे या गाडीचे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे ती इतर लहान गाड्यांपेक्षा वेगळी दिसते. यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन असून ते 68 PS पॉवर आणि 93 Nm टॉर्क देते. 5-स्पीड मॅन्युअलसोबत AMT चाही पर्याय आहे. 4.90 लाख रुपये सुरुवातीची किंमत असलेला 'Evolution AMT' व्हेरियंट भारतातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार मानला जातो. यात 8-इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्लेला सपोर्ट करते. ड्युअल स्पीकर सिस्टीम आणि कीलेस एंट्रीही दिली आहे.

पाचवी गाडी सिट्रोन सी३एक्स (Citroen C3X). तिचा एंट्री-लेव्हल 'लाइव्ह' व्हेरियंट 4.99 लाख रुपयांपासून घेता येतो. यात 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 82 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क देते. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडला आहे. मॅन्युअल एसी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुढच्या पॉवर विंडोज, मागचे पार्किंग सेन्सर्स आणि ड्युअल एअरबॅग्स या गरजेच्या सोयी या गाडीत मिळतात.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ