सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी: प्रियजनांना पाठवण्यासाठी निवडक मराठी शुभेच्छा संदेश
नव्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी केली तर मन प्रसन्न राहते. नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवण्यासाठी काही निवडक सुविचार.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सकाळी उठल्यानंतर दिवस आनंदात आणि उत्साहात जावा म्हणून प्रत्येक जण काही ना काही करतो. मन प्रसन्न राहावे आणि आयुष्यात सकारात्मकता वाढावी यासाठी चांगले विचार वाचणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक नवी सकाळ नव्या संधी आणि आनंद घेऊन येते. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने केली तर तो दिवस आनंदी, उत्साही आणि प्रेरणादायी जायला मदत होते.
हे विचार तुम्ही स्वतः वाचू शकता, तसेच नातेवाईक आणि प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा म्हणून पाठवू शकता. कुटुंबाला सकारात्मक दिवसाची चांगली सुरुवात करून द्यायला हे सुंदर विचार उपयोगी पडतात.
"चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यलाही किंमत देता येते, फक्त त्याच्यापुढे 'एक' होऊन उभे राहा. शुभ सकाळ!"
"बोटावर नाचवणारी खोटी माणसे जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी खरी माणसे जपा. आपला दिवस आनंदी जावो!"
"माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. शुभ सकाळ!"
"आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो. शुभ सकाळ!"
"जीवन गोड आहे, तेव्हा साजरे करा आणि आभार माना. हास्य आणि एक कप कॉफी म्हणजे परिपूर्ण सकाळ सुरू करण्यासाठी पुरे आहे. शुभ सकाळ!"
सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य स्वतःच मिळवावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही. आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही.
कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हरत नाही. शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास.
धुक्याकडून एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचे पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. शुभ सकाळ!
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश परिचय देतो. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका, चांगली कामे करत राहा, तीच तुमचा परिचय देतील.
चांगले कुटुंब आणि जिवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात. कोणी कितीही कडवट वागू देत, आपण स्वतःला शांत ठेवायचे, कारण सूर्यप्रकाश कितीही कडक असला तरी समुद्राला सुकवू शकत नाही.
नाती आणि बर्फाचा गोळा बनवणे सारखेच असते. दोन्ही बनवणे सोपे, पण टिकवणे खूप अवघड. दोघांना वाचवण्यासाठी एकच उपाय, कायम थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ सकाळ!