गुरुवार, 15 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
14 ऑक्ट | 11:40  एल. मुरुगन यांचा केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा 14 ऑक्ट | 18:40  दुष्काळग्रस्त तालुके ३०५ वर; शेतकऱ्यांना दिवाळीआधी ५,००० रुपयांचा विशेष बोनस 14 ऑक्ट | 18:06  नागपुरात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपातीचे निर्देश, मनपाचे परिपत्रक अद्याप नाही 00:15  नागपूर सीबीआय विशेष न्यायालयाकडून रेल्वेचे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर राकेश कुमार शर्मा लाचप्रकरणात निर्दोष 14 ऑक्ट | 21:50  वाशिममध्ये दुष्काळसदृश स्थितीत जनावरांच्या चाऱ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजनाचे आदेश 14 ऑक्ट | 21:50  साखर कारखाने उद्यापासून बंद पाडण्याचा राजू शेट्टी यांचा इशारा, ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर आणि ट्रक अडवणार
सर्व थेट अपडेट
00:21 IST

सेंसिटिव्ह स्किन असेल तर व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा, त्वचेला त्रास होण्याची शक्यता

सोशल मीडियावर व्हायरल होणारे लिंबू, बेकिंग सोडा आणि घरगुती फेस पॅकचे हॅक्स सेंसिटिव्ह त्वचेला त्रासदायक ठरू शकतात, असं सांगितलं जात आहे.

सेंसिटिव्ह स्किन असेल तर व्हायरल ब्युटी हॅक्स वापरण्याआधी थांबा, त्वचेला त्रास होण्याची शक्यता छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सध्या सोशल मीडियावर अनेक ब्युटी हॅक्स व्हायरल होत आहेत. कुणी चेहऱ्यावर लिंबू लावायला सांगतं, तर कुणी घरगुती स्क्रब आणि वेगवेगळे फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर असल्याचं सांगतं. मात्र ज्यांची त्वचा सेंसिटिव्ह आहे, त्यांनी हे हॅक्स ट्राय केले तर त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. ग्लोइंग स्किनच्या नादात चेहऱ्याचं नुकसान होऊ नये, म्हणून सेंसिटिव्ह स्किन असल्यास हे ब्युटी हॅक्स टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

नवीन प्रोडक्टमुळे किंवा काही विशिष्ट घटकांमुळे सेंसिटिव्ह स्कीनवर लालसरपणा, खाज, जळजळ आणि कोरडेपणा येऊ शकतो. त्यामुळे चेहऱ्यावर काहीही लावण्याआधी त्याचे संभाव्य परिणाम समजून घेणं महत्त्वाचं आहे. सेंसिटिव्ह स्कीन असेल तर कोणत्या गोष्टी चेहऱ्यावर लावू नयेत, ते पाहूया.

लिंबाचा रस आम्लधर्मी असतो, त्यामुळे तो थेट चेहऱ्यावर लावणं टाळावं. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास त्वचेवर गंभीर प्रतिक्रिया आणि व्रणही येऊ शकतात. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी माइल्ड म्हणजेच सौम्य क्लीन्झर वापरावा, असा सल्ला दिला गेला आहे.

बेकिंग सोडा त्वचेचा नैसर्गिक PH बॅलन्स बिघडवू शकतो. त्यामुळे कोरडेपणा, जळजळ होऊ शकते आणि स्कीन बॅरियर म्हणजेच संरक्षक थराचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच घरगुती फेस स्क्रब म्हणून बेकिंग सोड्याचा वापर टाळावा, असं सांगण्यात आलं आहे.

डेड स्कीन काढण्यासाठी वारंवार स्क्रब करण्याची गरज नसते. जास्त प्रमाणात स्क्रब आणि एक्सफोलिएटिंग प्रोडक्ट्स वापरल्यास सेंसिटिव्ह त्वचेची जळजळ वाढू शकते. त्यामुळे एक्सफोलिएट करायचं असेल तर ते त्वचेच्या गरजेनुसार करावं.

नवीन स्किनकेअर प्रोडक्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावण्याआधी, सर्वात आधी त्वचेच्या लहान भागावर पॅच टेस्ट करावी आणि काही दिवस रिअॅक्शन कशी येते याचं निरीक्षण करावं. मात्र पॅच टेस्टमधून प्रत्येक ऍलर्जीची प्रतिक्रिया दिसेलच असं नाही. त्यामुळे स्कीन अॅलर्जी असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एखादा फेस पॅक सोशल मीडियावर व्हायरल आहे, याचा अर्थ तो सर्व प्रकारच्या स्कीनसाठी सुरक्षित आहे असा होत नाही. सुगंध, सेंटेड ऑइल आणि काही नैसर्गिक घटकांमुळेही ऍलर्जी किंवा जळजळ होऊ शकते.

सेंसिटिव्ह स्कीनची काळजी कशी घ्यावी, याबद्दलही सांगितलं गेलं आहे. स्किनकेअर रुटीन जितकं सोपं असेल, तितकं नवीन प्रोडक्टमुळे होणाऱ्या जळजळीची कारणं ओळखणं सोपं जातं. चेहरा नेहमी सौम्य क्लीन्झरने किंवा फेस वॉशने स्वच्छ करावा. स्कीन टाइपप्रमाणे मॉइश्चरायझर लावावं आणि नियमितपणे सनस्क्रीन वापरावं. महत्त्वाचं म्हणजे, एकाच वेळी खूप जास्त नवीन प्रोडक्ट्स वापरणं टाळावं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ