बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

मैद्याऐवजी नाचणीच्या पिठाचे मोमोज, पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

मैद्याचे मोमोज खाण्याऐवजी वाटीभर नाचणीचे पीठ वापरून भाज्यांचे सारण भरलेले मोमोज करा. चवीला छान आणि शरीरासाठीही चांगले.

मैद्याऐवजी नाचणीच्या पिठाचे मोमोज, पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मोमोज म्हटले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते खायला खूप आवडतात, आणि मोमोज पाहिल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीर मोमोज, व्हेज मोमोज, स्टीम मोमोज असे अनेक प्रकार वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून केले जातात. पण दर वेळी मैद्याचेच मोमोज करून खाण्याऐवजी यावेळी वाटीभर नाचणीचे पीठ वापरून मोमोज करून बघायला हरकत नाही.

असे मोमोज चवीला तर छान लागतातच, शिवाय शरीरासाठीही पौष्टिक असतात. नाचणीच्या पिठात असलेले कॅल्शियम आणि भाज्यांमधील फायबर शरीरासाठी गुणकारी आहे. म्हणूनच मैद्याच्या मोमोजऐवजी नाचणीच्या पिठाचे मोमोज करणे चांगले. हा पदार्थ तयार करायला जास्त वेळ लागत नाही.

लहान मुले भाज्या खायचा खूप जास्त कंटाळा करतात. अशा वेळी नाचणीच्या पिठाचे मोमोज करून द्यावेत, कारण त्यात भाज्यांचे सारण भरलेले असते. चला तर मग, त्यासाठी काय काय लागते आणि ते कसे करायचे ते पाहूया.

साहित्य म्हणून नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल लागेल. सारणासाठी कोबी, शिमला मिरची, गाजर, आले-लसूण आणि कांदा घ्यायचा आहे. चवीसाठी सोया सॉस, काळी मिरी पावडर आणि टोमॅटो सॉस लागेल.

सर्वात आधी कोबी आणि गाजर बारीक किसून घ्या. ते हाताने मिक्स करून त्यातले पाणी काढून टाका. मग मोठ्या ताटात नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घ्या. गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ मळून घ्या.

त्यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा. मग कांदा, कोबी, गाजर आणि शिमला मिरची घाला आणि मंद आचेवर पाच ते दहा मिनिटे वाफेवर शिजवा. भाज्या शिजवताना मीठ घातले, तर सगळ्या भाज्यांना मीठ लागते.

नंतर त्यात काळी मिरी पावडर, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि आवडीनुसार इतर सॉस घालून सगळे नीट मिक्स करा. हे झाले की सारण तयार होते.

आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून पारी लाटा. प्रत्येक पारीत तयार मिश्रण भरून मोमोजचा आकार द्या. हे मोमोज तेल लावलेल्या चाळणीवर ठेवा आणि दहा मिनिटे वाफवून घ्या. झाले, झटपट तयार होणारे नाचणीचे हेल्दी, टेस्टी मोमोज तयार आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ