सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:56 IST

शामोंडा विषाणूची माणसात पहिली नोंद फ्रान्समध्ये; आतापर्यंत फक्त प्राण्यांमध्ये आढळायचा

आतापर्यंत फक्त प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या शामोंडा विषाणूची माणसातील पहिली अधिकृत नोंद फ्रान्समध्ये झाली आहे. ल्योन शहरातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर आजारी रुग्णाला लागण झाली होती.

शामोंडा विषाणूची माणसात पहिली नोंद फ्रान्समध्ये; आतापर्यंत फक्त प्राण्यांमध्ये आढळायचा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

फ्रान्समधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यंत फक्त प्राण्यांमध्येच आढळणाऱ्या शामोंडा (Shamonda) विषाणूची माणसातील पहिली अधिकृत नोंद फ्रान्समध्ये झाली आहे. करोनाच्या कहरानंतर जगभरात विषाणूयुद्ध, मानवनिर्मित विषाणू आणि नैसर्गिक विषाणू अशा अनेक गोष्टींची चर्चा सुरू झाली. जगभरात नव्या संसर्गजन्य आजारांबद्दल आधीच चिंता व्यक्त होत असताना ही बातमी आली आहे.

ल्योन शहरातील एका रुग्णालयात एक रुग्ण उपचार घेत होता. तो गंभीर आजाराने त्रस्त होता आणि त्याच्यामध्ये या विषाणूची लागण आढळली. ऑक्टोबरच्या सुरुवातीला या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूला हा विषाणू कारणीभूत ठरला की नाही, याचा तपास अजून सुरू आहे. या घटनेमुळे वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्राचे लक्ष फ्रान्सकडे वेधले गेले आहे.

फ्रान्समधील ल्योन येथील रुग्णालयात दाखल असलेल्या या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमकुवत होती. गंभीर आजारावरील उपचार सुरू असताना त्याच्यामध्ये न्यूरॉलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेशी संबंधित गुंतागुंत दिसून आली. त्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये शामोंडा विषाणूची उपस्थिती आढळली. कीटकांच्या चाव्यातून हा संसर्ग झाला असण्याची शक्यता तपासली जात आहे.

सहा दशकांपासून हा विषाणू प्राण्यांमध्ये अस्तित्वात आहे. शामोंडा विषाणू पहिल्यांदा १९६५ मध्ये नायजेरियात गुरांमध्ये ओळखला गेला होता. त्यानंतर आफ्रिकेतील आणि जपानमधील काही भागांत त्याची नोंद झाली. गाय, मेंढी, शेळी आणि घोडे अशा प्राण्यांमध्ये हा विषाणू प्रामुख्याने आढळतो. त्यामुळे आतापर्यंत तो माणसांसाठी संसर्गजन्य आहे असे मानले जात नव्हते. २०२६ मध्ये युरोपातही जनावरांमध्ये या विषाणूचा प्रसार दिसून आला आहे.

आता सामान्य नागरिकांना धोका आहे का, हा प्रश्न साहजिकच पुढे येतो. या घटनेनंतर फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेने परिस्थितीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार सामान्य नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका असल्याचे आढळलेले नाही. तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाल्याचा कोणताही पुरावा अजून मिळालेला नाही.

संसर्ग नेमका कसा झाला आणि मानवी शरीरावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा अभ्यास सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनाही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ