सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:35 IST

क्लिप कुणी व्हायरल केली ते फडणवीसांना विचारा, जरांगे पाटलांचा रामदास कदमांना टोला

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या आरोपांना मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले.

क्लिप कुणी व्हायरल केली ते फडणवीसांना विचारा, जरांगे पाटलांचा रामदास कदमांना टोला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना थेट उत्तर दिले आहे. "आम्ही तुम्हाला विचारतोय की तुम्हाला त्या ऑडिओ क्लिपची तारीख आणि वेळ कशी माहिती झाली? ती क्लिप व्हायरल कशी झाली, हे जाऊन फडणवीसांना विचारा. मीडियाला धमक्या देऊ नका," असे जरांगे पाटील म्हणाले.

कोटींच्या कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी कदम यांच्या मानसिक स्थितीवर आणि राजकीय भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

आधी कदम काय म्हणाले होते, ते पाहू. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावरून रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपवर गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी भाजपने कुणाकडून सुपारी घेतली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कदम पुढे म्हणाले की, जरांगे पाटील भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबत जेवण करतात. जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांची घेतलेल्या भेटीचे फोटोही कदम यांनी पत्रकार परिषदेत शेअर केले. त्यामुळे जरांगे पाटील आणि भाजपचे नेते एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कट रचत आहेत, असा दावा त्यांनी केला.

लाड यांच्यासोबतच्या जेवणावर टीका करणाऱ्यांनाही जरांगे यांनी उत्तर दिले. "प्रसाद लाड जेवायला आले तर तुमची पोटदुखी का होते? तुम्हाला जेवढ्या खोलात जायचंय तेवढं जाऊन बघा," असे ते म्हणाले. तुम्ही चिल्लर माणसासारखे वागू लागला आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.

कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांचाही जरांगे यांनी समाचार घेतला. "तुझ्या म्हाताऱ्याने कोणाची सुपारी घेतलीये, हे आधी बघ. सुपारी तर तुमच्या घरातच आहे. त्याचं नाव सांगा, तो कोण आहे ते आम्हीच शोधून काढू शकतो," असे आव्हान त्यांनी दिले.

रामदास कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी 'साडेसाती' आहेत, असे जरांगे म्हणाले. "रामदास कदम स्वतः बोलायला एवढी बुद्धी आहे का? ते त्रिकोणी आहेत. शिंदे साहेब बदनाम व्हावेत म्हणून यांनी खूप काही जमा करून ठेवलंय. हा माणूस शिवसेना संपवायला निघाला आहे," असेही त्यांनी सांगितले.

शेवटी उपरोधिक टोला लगावत जरांगे म्हणाले, "रामदास कदम येडा झाला आहे, त्याला लवकरात लवकर दवाखान्यात न्या! त्यापेक्षा संजय राऊत बरे आहेत, ते एकदा सकाळी मीडियासमोर येतात आणि विषय संपवतात."

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ