मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 303 | Very Poor 18:41 IST

विधान परिषद मतमोजणी: बालेवाडीत प्रतिनिधींचे पेन, डायऱ्या बाहेर, घड्याळावरून पोलिसांशी वाद

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. पुण्यात बालेवाडी स्टेडियमवर कडेकोट बंदोबस्त आहे.

विधान परिषद मतमोजणी: बालेवाडीत प्रतिनिधींचे पेन, डायऱ्या बाहेर, घड्याळावरून पोलिसांशी वाद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू झाली. तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतून एकूण 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. पुण्यात ही मतमोजणी बालेवाडी स्टेडियमवर सुरू आहे.

नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद या मतदारसंघांतील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक ठिकाणी मित्रपक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढती आहेत, बंडखोरी झाली आहे आणि अपक्षांनीही आव्हान उभे केले आहे. त्यामुळे राजकीय समीकरण गुंतागुंतीचे झाले असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांपैकी कोणाची संघटनात्मक ताकद मजबूत आहे आणि कोणाला आत्मपरीक्षण करावे लागेल, हे निकालातून स्पष्ट होईल.

पुणे शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत आहे. पदवीधर मतदारसंघात थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांचा या निवडणुकीत समावेश होता. सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी इथे आपली ताकद लावली होती. शिक्षक आणि पदवीधर, दोन्ही मतदारसंघांत चुरस रंगली आहे.

पोलीस आणि प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणाच्या मुख्य द्वारावरच कडेकोट बंदोबस्त तैनात आहे आणि संपूर्ण परिसरात पोलिसांचा पहारा आहे. आत जाणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची तपासणी केली जात आहे. ज्यांना ओळखपत्रे दिली आहेत, त्यांचे पेन आणि डायऱ्या बाहेरच काढून ठेवायला सांगितले जात आहे. काही प्रतिनिधींकडे डायऱ्या आणि कागद होते, तेही बाहेर ठेवण्यात आले. उमेदवारांच्या प्रतिनिधींना पेन, डायरी आणि घड्याळ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी घड्याळ घालून आत जाण्यावरून काही प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यात वाद झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

वाद झालेल्या एका प्रतिनिधीने सांगितले की, आमचा वाद पोलीस प्रशासनाशी नाही, तर त्यांच्या ढिसाळ कारभाराशी आहे. संपूर्ण नियोजन शून्य आहे. निवडणूक आयोगाने त्यांना काय गाईडलाईन्स दिल्या आहेत, ते मला माहीत नाही. डिजिटल वॉच आणि मोबाईल फोन आत नेण्यास परवानगी नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. आम्ही ते आणलेही नव्हते. पण साधे अॅनालॉग घड्याळही ते आत सोडत नव्हते आणि त्यासाठी आम्हाला वाद घालावा लागला.

त्यानंतर आता गाडीची चावीही आत नेता येणार नाही, असे ते म्हणतात, असे या प्रतिनिधीने सांगितले. मी गाडी 3 किलोमीटर लांब लावून चालत आलो आहे, मग चावी कुठे ठेवायची, असा सवालही त्यांनी केला. मतमोजणी केंद्रांवर कुठेही चूक होऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

#पुणे#PT24#Pune

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ