सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 09:18 IST

पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित, चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्सना सुनावले

राज्यातील पाच विधानपरिषद मतदारसंघांसाठी आज मतदान सुरू झाले असून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित, चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्सना सुनावले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यातील पाच विधानपरिषद मतदारसंघांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात मतदान होत आहे. तसेच पुणे, अमरावती आणि नागपूर या पदवीधर मतदारसंघांतील तीन जागांसाठीही मतदान आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक दर सहा वर्षांनी होते. आज सकाळी आठ वाजल्यापासून तिथे मतदानाला सुरुवात झाली. माध्यमांशी बोलताना पाटील यांनी सांगितले की, ते कोल्हापूरचा आढावा घेऊन इकडे आले आहेत. एका केंद्रावर जाऊन त्यांनी मतदारांची भेट घेतली आणि मतदारांना गुलाबाचे फूलही दिले.

पुणे मतदारसंघाच्या पाच जिल्ह्यांत सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे, असे पाटील म्हणाले. स्मिता जाधव प्रबोधन करणाऱ्या कुटुंबातील आहेत. त्या पीडी पाटील यांच्या कन्या आणि डी.वाय. पाटील यांच्या नात आहेत. कौस्तुभ गावडे यांचीही अशीच पार्श्वभूमी आहे. ते केवळ 1240 संस्थांचे चालक नाहीत, तर उच्चशिक्षितही आहेत. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे आणि दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने जिंकतील, असा विश्वास पाटील यांनी पुणे विधानपरिषद मतदारसंघाबद्दल बोलताना व्यक्त केला.

ट्रोलर्सना उत्तर देताना पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीचा उल्लेख केला. गोकुळ जसे झाले, तशी विधानसभा निवडणूकही झालीच ना, असे ते म्हणाले. लोकसभेनंतर 48 जागा मिळाल्या नाहीत, 17 मिळाल्या असे वाटले. मात्र विधानसभेला 237 जागा जिंकल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

या निवडणुकांबद्दल कोणी अंदाज व्यक्त करू शकत नाही, लोकशाही प्रगल्भ झाली आहे, असे पाटील यांनी म्हटले. गोकुळमध्ये पाटील यांच्या स्टेटमेंटची चेष्टा केली जात आहे असे वाटले, पण राहुल गांधीही म्हणतात की सगळ्या जागा जिंकणार, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांचे उदाहरण देऊन ट्रोलर्सना सुनावले. गिरणी कामगाराचा मुलगा राज्याच्या राजकारणात आला हे पटत नाही, मी कोणाला घाबरत नाही, आम्ही कोणाचे खातो, असेही पाटील यांनी म्हटले.

विरोधकांचा पराभव होणार हे स्पष्ट झाले आहे, असे सांगून पाटील म्हणाले की, पराभवानंतर काय बोलायचे याची उजळणी आता सुरू झाली आहे. काय होईल ते मतदारांवर सोडायचे असते. कधी जय, कधी पराजय, पण या वेळेस असे होणार नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त केला.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ