सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 09:21 IST

सोलापुरात दिलीप मानेंच्या संस्थेतील १७०० मतदार एकत्र मतदानाला, पुणे पदवीधर निवडणूक

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी सोलापुरात भाजप नेते दिलीप माने यांच्या BMIT संस्थेतील १७०० मतदार एकत्र मतदानाला गेले.

सोलापुरात दिलीप मानेंच्या संस्थेतील १७०० मतदार एकत्र मतदानाला, पुणे पदवीधर निवडणूक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी आज, शुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान चालणार आहे. पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

पदवीधर मतदारसंघ पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांचे आहेत. शिक्षक मतदारसंघ अमरावती आणि पुणे विभागांचे आहेत. पाचही मतदारसंघांसाठी जय्यत तयारी केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. एकूण दोन हजार ४१९ मतदान केंद्रं उभारली असून १० लाख ६८ हजार ७२ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सोलापुरात पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी भाजप नेते दिलीप माने यांनी सामूहिक मतदान घडवून आणलं. त्यांच्या BMIT शिक्षण संस्थेतील १७०० मतदार एकत्र मतदानाला जाताना दिसले. माजी आमदार दिलीप माने काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेले आहेत. संस्थेतील सर्व मतदारांना सोबत घेऊन ते मतदानासाठी निघाले.

महाविकास आघाडीच्या पुणे विभाग पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी विजयाची अपेक्षा व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, निवडणुकीचे केंद्रबिंदू पदवीधर आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी मला मिळाली आहे. पदवीधर मतदार सुजाण आहे. रोजची महागाई वाढली आहे, त्यामुळे मतदार नक्की योग्य निर्णय घेईल. पवार साहेबांचा आशीर्वाद सुरुवातीलाच घेतला होता, असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये जसा गुलाल उधळला गेला, तसाच २७ तारखेला पुन्हा उधळला जाईल, असं त्या म्हणाल्या. शक्यतो सगळ्यांनी सकाळीच मतदान करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

पुणे शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सचिन सानप रिंगणात आहेत. त्यांना शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्नही झाले. सानप यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या विजयाचा विश्वास आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा शिक्षकांचा आमदार होईल, अशी आशा कुटुंबीयांनी व्यक्त केली. मतदानाच्या दिवशी सानप यांनी देवदर्शन घेतलं आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन केलं. शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा अशी इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

राज्यात पाच जागांसाठी १८२ उमेदवार असल्याने निवडणुकीत कमालीची चुरस आहे. महायुतीमध्ये झालेली बंडखोरी आणि पक्षांतर्गत नाराजी यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची धास्ती वाढली आहे. महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

छत्रपती संभाजीनगरसाठी ८ जिल्ह्यांत मतदान होत आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधरसाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथे मतदान आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम इथे मतदान होत आहे. नागपूर पदवीधरसाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली इथे मतदान होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ