महागडे लिप प्रॉडक्ट विसरा, तूप-नारळ तेल आणि बीट वापरून घरीच बनवा नॅचरल लिपबाम
ओठ कोरडे पडल्यावर बाजारातील महागडे प्रॉडक्ट किंवा ट्रीटमेंट घेण्याऐवजी घरातल्या साध्या पदार्थांपासूनच लिपबाम तयार करता येतो. तूप, नारळाचं तेल आणि बीट या तीनच पदार्थांत हा लिपबाम बनतो.
चेहऱ्याइतकीच ओठांची काळजी घेणंही महत्त्वाचं असतं. ओठ नॅचरली गुलाबी आणि हायड्रेट राहावेत यासाठी बऱ्याच महिला सतत काही ना काही प्रयत्न करत असतात. पण बदलत्या वातावरणामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे ओठांचं आरोग्य बिघडतं आणि ते कोरडे पडतात.
ओठ कोरडे झाल्यावर ते पुन्हा चमकदार दिसावेत म्हणून बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. काहीवेळा ओठांसाठी खास ट्रीटमेंटदेखील घेतली जाते. पण अशा ट्रीटमेंटमुळे ओठ फक्त काही वेळापुरतेच सुंदर दिसतात आणि नंतर पुन्हा कोरडे पडून त्वचा रखरखीत दिसू लागते.
त्यामुळे महागड्या प्रॉडक्टवर पैसे खर्च करण्याऐवजी घरातल्या साध्या पदार्थांपासूनच लिपबाम तयार करता येतो. यासाठी वेगळं काही आणायची गरज नसते, फक्त तूप, नारळाचं तेल आणि बीट एवढंच साहित्य लागतं. हे तिन्ही पदार्थ बहुतेकांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात.
लिपबाम बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सर्वप्रथम एका वाटीत किसलेल्या बीटचा रस घ्यावा. त्यात एक चमचा तूप आणि अर्धा चमचा नारळाचं तेल घालावं. हे दोन्ही पदार्थ चमच्याने चांगलं फेटून घ्यावं, ते क्रिमी होईपर्यंत फेटत राहावं म्हणजे लिपबाम व्यवस्थित सेट होतो. तयार झालेलं मिश्रण काचेच्या हवाबंद डब्यात भरून ठेवावं, यामुळे ते जास्त काळ टिकतं आणि खराब होत नाही. हा लिपबाम फ्रिजमध्ये १५ ते २० मिनिटं सेट होण्यासाठी ठेवावा.
रोज रात्री झोपण्याआधी हे लिपबाम ओठांवर लावल्यास ओठ हायड्रेट राहण्यास मदत होते. लिपस्टिक लावण्याआधीही हे लिपबाम लावता येतं, यामुळे ओठांना खोलवर पोषण मिळून ते चमकदार दिसतात. ओठ कोरडे पडणं किंवा त्वचेसंबंधी इतर तक्रारी वाढल्यास महागड्या प्रॉडक्टपेक्षा असे घरगुती उपाय करावेत, कारण यामुळे ओठांचं सौंदर्य जास्त काळ टिकतं आणि समस्या कमी होतात.
वारंवार लिपस्टिक किंवा बाजारातील लिपबाम लावल्याने ओठ काळे आणि कोरडे पडतात आणि त्यामुळे त्वचेचं सौंदर्य बिघडतं. त्यामुळे महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांवर पैसे खर्च करण्याऐवजी घरातल्या स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास ओठांचं सौंदर्य अधिक खुलून येतं. घरगुती लिपबाम ओठ नॅचरली स्मूथ ठेवण्यास मदत करतं. बीटच्या रसातील घटक ओठांवरील गुलाबीपणा वाढवण्यास उपयुक्त ठरतात असं सांगितलं जातं.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे, यात कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.