गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
14:25 IST

फेसबुक उघडताच थेट व्हिडिओ; भारतात फुल-स्क्रीन फीडची चाचणी सुरू

फेसबुक भारतात फुल-स्क्रीन व्हिडिओ फीडची चाचणी करत आहे, जुनी Home Feed वेगळ्या टॅबमध्ये राहणार आहे आणि विक्रेत्यांसाठी Meta AI सुविधांसह 'Seller' अॅप लाँच झाले आहे.

फेसबुक उघडताच थेट व्हिडिओ; भारतात फुल-स्क्रीन फीडची चाचणी सुरू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

फेसबुकमध्ये आता मोठा बदल होत आहे. आतापर्यंत अॅप उघडलं की फोटो आणि पोस्ट दिसायच्या, पण आता अॅप उघडताच टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्ससारखा मोठा, फुल-स्क्रीन व्हिडिओ समोर येणार आहे. हा बदल सगळ्यात आधी भारतात टेस्ट केला जात आहे.

भारतात फेसबुकचे 40 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत. भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ असल्यामुळे हा प्रयोग इथूनच सुरू करण्यात आला आहे.

पूर्वी फेसबुक अॅप उघडल्यावर मित्रांच्या पोस्ट, फोटो किंवा बातम्या दिसत होत्या. मेटाने केलेल्या एका रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की, लोकांना आता पोस्ट वाचण्यापेक्षा व्हिडिओ बघण्यात जास्त रस आहे. लोक सगळ्यात जास्त वेळ रील्सवर घालवतात. म्हणून फेसबुकने हा व्हिडिओ-फर्स्ट प्लॅन आणला आहे. आता अॅप उघडताच फुल स्क्रीनवर रील्स आणि व्हिडिओ दिसतील आणि स्क्रोल केलं की नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील.

मग जुनी फीड कुठे गेली, असा प्रश्न पडू शकतो. जुनी फीड बंद झालेली नाही. ती अॅपमध्ये एका वेगळ्या टॅबमध्ये राहणार आहे. हवं असेल तर तिथे जाऊन जुन्या पोस्ट बघता येतील. हा अपडेट आवडला नाही, तर तो बंद करण्याचीही सोय आहे. त्यासाठी कंपनीने Opt-Out चा ऑप्शन दिला आहे.

फेसबुकने फक्त बघणाऱ्यांसाठीच नाही, तर विकणाऱ्यांसाठीही नवी सुविधा आणली आहे. फेसबुक मार्केटप्लेसला आता 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने मेटाने 'Seller' नावाचं एक नवीन आणि फ्री अॅप लाँच केलं आहे. हे अॅप मार्केटप्लेसवर वस्तू विकणाऱ्यांसाठी आहे आणि त्यात AI ची खूप मोठी मदत मिळणार आहे.

उदाहरणार्थ, एखाद्याला आपली वस्तू विकायची असेल, तर त्याला फक्त त्या वस्तूचा एक फोटो काढून अपलोड करायचा आहे. बाकीचं सगळं काम Meta AI करेल. वस्तूचं नाव काय ठेवायचं, वर्णन काय लिहायचं, ती कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायची आणि तिची किंमत काय असावी, हे सगळं तो स्वतःहून सुचवेल. त्यामुळे विक्रेत्यांचं अर्धं काम तिथेच सोपं होतं.

जे लोक मोठ्या प्रमाणावर विक्री करतात, त्यांना ग्राहकांचे सगळे मेसेज एका ठिकाणी बघता येतील, म्हणून Unified Inbox दिला आहे. किती माल शिल्लक आहे आणि काय विकलं गेलं हे बघण्यासाठी Inventory Management Tool पण देण्यात आलं आहे.

सध्या हे सेलर अॅप अमेरिकेत iOS युजर्ससाठी सुरू झालं आहे. लवकरच ते अँड्रॉइडसाठी येणार आहे आणि नंतर भारतातही लाँच होईल. एकंदरीत फेसबुकला आता पूर्णपणे व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनायचं आहे. लोकांनी जास्तीत जास्त वेळ व्हिडिओ बघत राहावं, हाच त्यामागचा उद्देश आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ