विवो वाय 600के टर्बो चीनमध्ये लाँच, 90W चार्जिंग आणि 5000 निट्सचा डिस्प्ले
विवोने चीनमध्ये Y600-सीरीजमधला आणखी एक स्मार्टफोन आणला आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या एकाच व्हेरिअंटची किंमत 2,799 CNY आहे.
टेक कंपनी विवोने चीनमध्ये आपला आणखी एक नवा स्मार्टफोन Vivo Y600k Turbo लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या Y600-सीरीजमधला आहे. अलीकडेच विवोने याच सीरीजमधला Y600i हा फोन सादर केला होता. त्यानंतर आता कंपनीने याच सीरीजमधला हा दुसरा फोन बाजारात आणला आहे. नुकताच लाँच झालेला हा फोन Y600 Turbo चे नवे वर्जन असल्याचे सांगितले जात आहे. आता या फोनची किंमत आणि फीचर्स काय आहेत, ते पाहूया.
किंमत आणि उपलब्धतेबद्दल सांगायचे तर, विवो वाय 600के टर्बो फक्त एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये मिळतो. त्यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. या व्हेरिअंटची किंमत 2,799 CNY आहे, म्हणजेच सुमारे 41 हजार रुपये. ग्राहकांना हा फोन इलेक्ट्रिक ब्लू, ड्यून गोल्ड आणि मिलेनियल पिंक या तीन रंगांत खरेदी करता येईल.
आता फोनच्या डिस्प्लेकडे येऊ. या फोनमध्ये 6.83-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 130Hz पर्यंत टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनची लोकल पीक ब्राइटनेस 5000 निट्सपर्यंत जाऊ शकते. फोन चालवण्यासाठी त्यात स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 प्रोसेसर आहे. सोबत 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे.
या फोनची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी. त्यात 9,020mAh टिपिकल-कॅपेसिटीची बॅटरी आहे आणि ती 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मात्र या फोनमध्ये दिलेला नाही. यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे हा फोन रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो.
कॅमेऱ्याच्या बाबतीत, फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. त्याच्या जोडीला 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. रियर कॅमेरा 4K पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो, तर फ्रंट कॅमेरा 1080p पर्यंतच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सॉफ्टवेअरच्या बाबतीत फोनमध्ये ओरिजिनओएस 6 वर आधारित अँड्रॉईड 16 मिळणार आहे.
इतर फीचर्समध्ये अंडर-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर, डुअल स्पीकर, आयआर ब्लास्टर, एनएफसी, वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.2 सपोर्ट यांचा समावेश आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी फोनला IP68/IP69 रेटिंग दिले आहे. शिवाय या फोनने आठ मिलिट्री-स्टँडर्ड एनवायरनमेंटल चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत, त्यावरून त्याच्या मजबुतीची कल्पना येते.