बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:48 IST

फाइंडॅबिलिटी सायन्सेसचे दुग्ध केंद्रांसाठी 'लॅक्टा इनसाईट' सादर, दुधाची तूट रोखण्यावर भर

अप्लाइड एआय आणि डेटा लॉजिस्टिक्समधील कंपनी फाइंडॅबिलिटी सायन्सेसने दुग्ध व्यवसायासाठी 'लॅक्टा इनसाईट' हे नवे उत्पादन लाँच केले आहे. भारतातील सर्व दुग्ध उत्पादक व प्रक्रिया केंद्रांसाठी ते उपलब्ध आहे.

फाइंडॅबिलिटी सायन्सेसचे दुग्ध केंद्रांसाठी 'लॅक्टा इनसाईट' सादर, दुधाची तूट रोखण्यावर भर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अप्लाइड एआय आणि डेटा लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी फाइंडॅबिलिटी सायन्सेसने दुग्ध व्यवसायासाठी खास तयार केलेले 'लॅक्टा इनसाईट' हे नवे उत्पादन लाँच करत असल्याची घोषणा केली. हे उत्पादन कंपनीच्या 'लॅक्टाआय' या फ्लॅगशिप प्लॅटफॉर्मचा भाग आहे. भारतातील सर्व दुग्ध उत्पादक आणि प्रक्रिया केंद्रांना ते उपलब्ध आहे.

भारत २०२४-२५ मध्ये २४७.८७ दशलक्ष टन दूध उत्पादनासह जगातील अग्रगण्य देश राहिला आहे. एवढी मोठी क्षमता असल्याने दुधाचे संकलन, प्रक्रियेतील स्थैर्य आणि ऊर्जेचा वापर यांत झालेली छोटी सुधारणाही प्रक्रिया केंद्रांना मोठा आर्थिक फायदा देऊ शकते. प्रक्रियेदरम्यान दुधातील मौल्यवान घटकांची जी तूट होते, ती अनेकदा प्रयोगशाळेचे निष्कर्ष आल्यावरच कळते. तोपर्यंत झालेले नुकसान भरून काढता येत नाही.

'लॅक्टा इनसाईट' प्रयोगशाळा, गुणवत्ता, निगा आणि एंटरप्राइज डेटा एकमेकांशी जोडते. त्यामुळे उत्पादनातील तूट वाढण्याआधीच केंद्रांना ती ओळखता येते. सर्व संकेतांचे एकत्र विश्लेषण करून त्यामागची संभाव्य कारणे लवकर शोधणेही सोपे होते. बाष्पीभवन आणि वाळवण्याच्या प्रक्रियेत टाळता येण्याजोगा वाफेचा, पाण्याचा आणि ऊर्जेचा वापर ओळखून मोठी आर्थिक बचत साधता येते.

ही प्रणाली स्वतंत्रपणे प्लांटच्या सेटिंग्जमध्ये बदल करत नाही. ऑपरेटिंग टीमचे पूर्ण नियंत्रण कायम राहते आणि ऑपरेटरच्या प्रत्येक निर्णयाची नोंद पुढील ऑडिटसाठी ठेवली जाते.

फाइंडॅबिलिटी सायन्सेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी सांगितले, "बहुतेक दुग्ध प्रक्रिया केंद्रांकडे नुकसान ओळखण्यासाठी लागणारी माहिती असते, पण ती वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये विखुरलेली असते. 'लॅक्टा इनसाईट' उत्पादन अजूनही लाईनवर असताना काय बदलत आहे, ते का महत्त्वाचे आहे आणि कुठे हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, हे पाहण्यास प्लांट टीमला मदत करते. सध्या भारतातील एका मोठ्या दुग्ध प्रक्रिया केंद्रात याचे यशस्वी मूल्यमापन सुरू असून प्रत्यक्ष अडचणींवर मात करून स्पष्ट परिणामांवर आमचा भर आहे."

'लॅक्टा इनसाईट' केंद्रातील सध्याच्या पीएलसी, एससीएडीए, डीसीएस, इआरपी, एमईएस आणि एलआयएमएस यंत्रणांशी सहज जोडले जाते. त्यामुळे केंद्रांना आपल्या सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज नाही. सध्या हे उत्पादन लोणी, दुधाची पावडर, मिल्क प्रोटीन कन्संट्रेट आणि व्हे लाईन्ससाठी उपलब्ध आहे. भविष्यात चीज आणि इतर उत्पादनांसाठीही त्याचा विस्तार केला जाऊ शकतो.

प्रक्रिया केंद्रांना ३० मिनिटांच्या मोफत 'डेअरी एआय रेडीनेस असेसमेंट'ची विनंती करता येते. आपल्या प्लांटमधील डेटा या प्रणालीसाठी किती सुसंगत आहे, हे त्यातून तपासता येते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ