बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:01 IST

पॅरिसहून मुंबईत आलेल्या २३ वर्षांच्या निकोला तीन आठवड्यांत शहरात आपलेपणा सापडला

फायनान्समध्ये करिअर करण्यासाठी भारतात आलेल्या निकोने मुंबईतील तीन आठवड्यांचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.

पॅरिसहून मुंबईत आलेल्या २३ वर्षांच्या निकोला तीन आठवड्यांत शहरात आपलेपणा सापडला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

शांत आणि शिस्तबद्ध युरोपियन शहरात वाढलेला माणूस थेट मुंबईच्या गर्दीत येऊन पडला, तर त्याची काय अवस्था होईल? पॅरिसहून आलेल्या २३ वर्षांच्या निकोला असाच अनुभव आला आहे. पॅरिसमधली आरामाची लाईफ सोडून तो भारतात आला. फायनान्समध्ये चांगले करिअर करायचे, एवढेच त्याच्या डोक्यात होते.

पण मुंबईत पाऊल ठेवताच त्याचे सगळे विचार बदलून गेले. इथली एनर्जी, गर्दी आणि गोंधळ यांनी त्याचे आयुष्यच बदलले. मुंबईत येऊन त्याला फक्त तीन आठवडे झाले आहेत. तरीही एवढ्या कमी दिवसांत मुंबईने त्याला असे धडे दिले, जे पॅरिसच्या कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला मिळाले नसते.

निकोने आपला हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून कॅप्शनमध्ये त्याने तीन गोष्टी लिहिल्या आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे इथले खाद्यपदार्थ. भारतीय जेवण चविष्ट असते हे त्याला माहीत होते. पण त्यात किती प्रचंड वैविध्य आहे आणि रोज काहीतरी नवीन शोधण्यात किती आनंद मिळेल, याची त्याला कल्पना नव्हती. इथला तिखटपणा सहज सहन करण्यासारखा आहे, असेही तो म्हणतो.

दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना भेटणे किती सोपे आहे. इथे आला तेव्हा त्याची कोणाशीच ओळख नव्हती. पण इथल्या लोकांनी त्याचे खूप स्वागत केले आणि ते त्याच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. कामाच्या ठिकाणी असो, बाहेर फिरताना असो किंवा शहराचा शोध घेताना असो, नेहमीच कोणीतरी नवीन व्यक्ती भेटते, असे त्याने लिहिले आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे पाहण्यासारख्या आणि शोधण्यासारख्या किती गोष्टी आहेत. मुंबई इतकी विशाल वाटते की ती कधीच संपणार नाही असे वाटते, असे निको म्हणतो. नवीन परिसर, रेस्टॉरंट्स, समुद्रकिनारे, बाजारपेठा, सण-उत्सव, वास्तुकला आणि नाईटलाइफ यांमुळे प्रत्येक आठवड्याच्या शेवटी बाहेर पडण्याचे आणि काहीतरी नवीन शोधण्याचे नवे कारण मिळते.

तीन आठवड्यांच्या या नवीन प्रवासात आपल्याला सर्वात जास्त आवडलेल्या गोष्टी कदाचित या आहेत, असे त्याने लिहिले आहे. पुढे अजून खूप काही अनुभवता येणार आहे, यात शंका नाही, असेही तो म्हणतो.

त्याच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विचारले की, एवढे सुंदर पॅरिस सोडून तू मुंबईत का आलास? त्यावर निकोने सांगितले की, त्याला फक्त पगारासाठी भारतात यायचे नव्हते. त्याला भारताची संस्कृती आणि इथली माणसे जवळून बघायची होती.

इथे भाषा येत नाही, गर्दी आहे, त्रास आहे, पण तरीही हे शहर जितका त्रास देते त्यापेक्षा जास्त प्रेम देते, असे त्याचे म्हणणे आहे. सुरुवातीला त्याला या शहराची भीती वाटत होती. आता मात्र हेच शहर त्याला आपले वाटू लागले आहे आणि तो पूर्णपणे मुंबईकर होऊन शहराच्या गर्दीत मिसळून गेला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ