बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:00 IST

M-Indicator च्या चॅटमध्ये मुंबईकरांच्या टाइमपास गप्पा, मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

ट्रेनच्या माहितीसाठी दिलेल्या M-Indicator चॅटमध्ये मुंबईकर आता गप्पा मारत आहेत आणि त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर फिरत आहेत.

M-Indicator च्या चॅटमध्ये मुंबईकरांच्या टाइमपास गप्पा, मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबईत लोकल, बस किंवा मेट्रोचे तिकीट काढायचे असेल, तर बहुतेक जण आधी M-Indicator उघडतात. घरातून निघण्यापूर्वी अॅप एकदा बघितले की प्रवासाचा सगळा प्लॅन क्लिअर होतो. मुंबईकर आणि या अॅपचे नाते काय आहे, हे वेगळे सांगायची गरजच नाही.

पण आता हे अॅप फक्त वेळ बघण्यापुरते राहिलेले नाही. लोक त्याचा वापर सोशल मीडियासारखा करत आहेत. व्हॉट्सअॅपसारखे चॅटिंग तिथे सुरू असून त्या चॅटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ते वाचून पोट धरून हसायला येते.

M-Indicator मध्ये प्रवाशांसाठी चॅटचा एक ऑप्शन दिलेला आहे. एखाद्या ट्रेनला उशीर झाला, गर्दी आहे का किंवा आणखी काही माहिती असेल, तर प्रवाशांनी ती एकमेकांना सांगावी, यासाठी तो दिला होता. पण मुंबईकरांनी तो माहितीसाठी नाही, तर टाइमपासच्या गप्पा मारण्यासाठी वापरायला सुरुवात केली आहे.

एका व्हिडिओमध्ये RJ Princy Parikh तिथले चॅट वाचून दाखवत आहे. ते इतके भारी आहेत की कॉमेडी शो बघतोय की काय, असे ऐकताना वाटते.

एकाने चॅटमध्ये लिहिले की CSMT ते टिटवाळा प्रवास करताना त्याचा मोबाईल हरवला आहे. त्यावर एकाने लगेच विचारले, "फोनमधली सर्च हिस्ट्री डिलीट केली होतीस का रे?" तर दुसरा म्हणाला, "पुढचं स्टेशन पोलीस स्टेशन आहे."

दुसऱ्या एका चॅटमध्ये अर्जुन नावाच्या मुलाने विचारले, "जोगेश्वरीतला सुदर्शन बार चालू आहे का?" त्यावर एकाने उत्तर दिले, "हो चालू आहे, तिथला बांगडा मसाला एकदा खाऊन बघ."

आणखी एकाने विचारले, "ट्रेनमध्ये बसायला जागा आहे का?" त्यावर उत्तर आले, "अरे इथे मुंगीला पण पाय ठेवायला जागा नाही, बसायचे सोडून दे." ऋतूजा नावाच्या एका मुलीने विचारले, "कल्याण AC ट्रेन कुठे पोहोचली?" तिला कुणीतरी रिप्लाय दिला, "कोणी फ्रँकी खायला येणार आहे का?"

ट्रेनला उशीर झाला की प्रवाशांचा राग याच चॅटवर निघतो. एकाने विचारले, ट्रेन कुठे आहे? तर एकजण म्हणाला, "ट्रेन उशिरा आली तरी चालेल, पण लग्नाला उशीर व्हायला नको."

हा व्हिडिओ आतापर्यंत 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे आणि लोकांना हे चॅट खूपच आवडत आहेत. चांगल्या कामासाठी दिलेल्या या पर्यायाला मुंबईकरांनी एक छोटा फेसबुकच बनवून टाकले आहे. कोणी कोणाची मजा घेतोय, कोणी तक्रार करतोय, कोणी खरोखर मदत करतोय, तर कोणी आपल्या दुकानाची जाहिरातही तिथेच करतोय.

थोडक्यात, M-Indicator चे हे चॅट म्हणजे टाइमपासचा धमाल अड्डा झाला आहे. एकदा वाचायला लागले की आपले स्टेशन कधी आले हेही कळत नाही. तुम्ही कधी M-Indicator वर असे मेसेज केले आहेत का, किंवा असे काही मजेशीर चॅट वाचले आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ