बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:13 IST

चिनाब पुलामुळे काश्मिरी फळे रेल्वेने मुंबईत, गोणीमागे वाहतूक खर्च १०-१५ रुपयांवर

चिनाब पुलामुळे काश्मीरचा नाशवंत माल रेल्वेने कमी खर्चात आणि कमी वेळात मुंबईच्या बाजारात पोहोचत आहे; शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही त्याचा फायदा होत आहे.

चिनाब पुलामुळे काश्मिरी फळे रेल्वेने मुंबईत, गोणीमागे वाहतूक खर्च १०-१५ रुपयांवर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रस्त्यातले अडथळे आणि हवामानाचा लहरीपणा यामुळे काश्मीरमधले फळबागायतदार नेहमीच अडचणीत सापडायचे. आता जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाने काश्मीरला देशाच्या बाजारपेठेशी थेट जोडले आहे. त्यामुळे सफरचंद आणि चेरीसारखा नाशवंत माल मुंबईपर्यंत लवकर आणि कमी खर्चात पोहोचू लागला आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही यातून फायदा होत आहे.

पूर्वी श्रीनगरहून मुंबईपर्यंत ट्रकने माल आणायचा झाला, तर ४५ तासांपेक्षा जास्त वेळ लागत असे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर दरड कोसळणे, पावसामुळे रस्ता बंद पडणे आणि वाहतूक कोंडी यामुळे माल सडण्याचे प्रमाण मोठे होते. याच कारणामुळे व्यापारी शेतकऱ्यांकडून माल कमी दराने उचलत होते.

चिनाब आणि अंजी केबल पूल सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलले आहे. आता बडगाम-कटरा-दिल्ली-मुंबई हा संपूर्ण रेल्वे कॉरिडॉर सुरू झाला असून मालगाड्या ताशी १०० किमी वेगाने धावत आहेत. त्यामुळे काश्मीरची प्रसिद्ध अक्रोड, केशर, गालिचे आणि शाली महाराष्ट्राच्या बाजारात थेट उपलब्ध होत आहेत.

या नव्या मार्गाचे दोन मोठे फायदे सांगितले जातात. पहिला म्हणजे वाहतुकीचा खर्च. रस्ते मार्गाने प्रति गोणी ८०-९० रुपये लागत होते, तो खर्च रेल्वे मार्गाने प्रति गोणी १०-१५ रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच सुमारे ६० टक्के बचत होत आहे. दुसरा फायदा म्हणजे माल खराब होण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे.

काश्मीरचे बागायतदार मोहम्मद अली शेख यांच्या म्हणण्यानुसार, माल वेळेत आणि सुरक्षित पोहोचत असल्याने आता बागायतदारांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ३ जूनला कटरा येथून चेरीची पहिली २४ टनांची पार्सल व्हॅन निघाली आणि अवघ्या ३० तासांत वांद्रे टर्मिनसला पोहोचली. त्यानंतर १३ सप्टेंबर २०२५ पासून बडगाम ते दिल्लीतील आदर्शनगरपर्यंत विशेष पार्सल सेवा सुरू करण्यात आली. १५ सप्टेंबर २०२५ नंतर आतापर्यंत २० हजार टनांपेक्षा जास्त सफरचंद रेल्वेने देशभरात पाठवण्यात आले आहे. त्यातला मोठा हिस्सा मुंबईच्या बाजारात आला आहे.

चिनाब रेल्वे पुलामुळे काश्मिरी फळांना महाराष्ट्रातली बाजारपेठ मिळवून देण्याची संधी निर्माण झाली, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. नियमित मालगाड्या, पार्सलसाठी उपलब्ध क्षमता आणि स्थानकांपासून घाऊक बाजारांपर्यंतची वाहतूक व्यवस्था यामुळे व्यापाराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी समाधानी आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ