मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:47 IST

अरे देवा... मग सॅलरीचं काय? बँक स्ट्राइकमुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार

२८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांच्या बँक संपापूर्वी २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार आल्याने बँकांचे कामकाज सलग पाच दिवस विस्कळीत होणार आहे. त्यामुळे अनेकांचा सप्टेंबर महिन्याचा पगार अडकण्याची भीती आहे.

अरे देवा... मग सॅलरीचं काय? बँक स्ट्राइकमुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

ज्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या तारखेला जमा होतो, त्यांच्यासाठी या महिन्यात थोडी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांत देशभरात बँकांचा संप पुकारण्यात आला आहे. याआधी २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार आल्यामुळे बँकांचे कामकाज सलग पाच दिवस विस्कळीत होण्याची शक्यता आहे. म्हणजेच २६ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबरपर्यंत बँकांचे व्यवहार थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात अनेकांचा पगार अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

२६ ते ३० सप्टेंबर या काळात बँका बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, सप्टेंबर महिन्याचा पगार नेमका कधी येणार? कोणाचा पगार वेळेवर जमा होईल आणि कोणाला उशीर होईल, याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

सर्वप्रथम कोणाला पगार मिळणार, याबाबत बोलायचं झालं तर केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँक संपाचा फटका कमी बसावा यासाठी अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर महिन्याचा पगार, वेतन आणि निवृत्तीवेतन २५ सप्टेंबर रोजीच वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजेच केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना संप सुरू होण्याआधीच त्यांचे पैसे मिळणार आहेत.

दुसरीकडे, कोणाच्या पगाराला उशीर होऊ शकतो, हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. ज्या कंपन्या २८ सप्टेंबरपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची प्रक्रिया पूर्ण करतात, त्यांना वेळेवर पगार मिळू शकतो. मात्र ज्या कंपन्यांची पगार प्रक्रिया २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होते, त्यांना विलंब सहन करावा लागू शकतो. म्हणजेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे सर्व त्यांच्या कंपनी आणि संबंधित बँकेच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असेल. कंपनीने पगाराची प्रक्रिया कधी सुरू केली, यावरच पगार वेळेवर मिळणार की उशिरा, हे ठरणार आहे.

संपाच्या काळात नेमकं काय बंद राहणार, याबद्दलही स्पष्टता आहे. संप झाल्यास चेक क्लिअरन्स, रोख रक्कम जमा करणे आणि काढणे, डिमांड ड्राफ्ट तसंच नवीन खाते उघडणे या सेवांवर परिणाम होऊ शकतो. या सगळ्या सेवांसाठी बँकेतील कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती लागते, त्यामुळे संपाचा थेट फटका या व्यवहारांना बसू शकतो. मात्र एटीएम, यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत, कारण या सेवा डिजिटल पद्धतीने चालतात आणि त्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नसते.

२७ सप्टेंबर, रविवारी बँका सुरू राहणार का, हा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे. बँकांमध्ये होणारी गर्दी कमी व्हावी यासाठी आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रविवार, २७ सप्टेंबर रोजी उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे ग्राहकांना २८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संपापूर्वी आपली महत्त्वाची बँकिंग कामं पूर्ण करता येतील आणि पगार देखील वेळेवर जमा होऊ शकेल. थोडक्यात, रविवारी बँका उघडी ठेवण्यामागचा उद्देश ग्राहकांना संपापूर्वी आपली कामं आटोपण्याची संधी देणे हाच आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ