दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नावावर बनावट कर्ज घेतलं गेलंय का? पॅन-आधारचा गैरवापर क्रेडिट रिपोर्टमधून असा ओळखा

नावावर बनावट कर्ज घेतलं गेलंय का? पॅन-आधारचा गैरवापर क्रेडिट रिपोर्टमधून असा ओळखा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

दिवाळीच्या सणासुदीत ऑनलाईन ऑफर्सच्या नावाखाली पॅन आणि आधारचा गैरवापर करून बनावट कर्ज घेण्याचे नवे फंडे सायबर गुन्हेगारांनी शोधले आहेत. क्रेडिट रिपोर्टवरून हे दोन मिनिटांत तपासता येतं.

दिवाळीच्या सणासुदीत ऑनलाईन ऑफर्सच्या नावाखाली सायबर गुन्हेगार पॅन आणि आधार कार्डचा गैरवापर करून 'फेक लोन' घेण्याचे नवे फंडे वापरत आहेत. आपल्या नकळत दुसऱ्या कोणीतरी आपल्या नावावर इन्स्टंट कर्ज उचललं नाही ना, हे ऑनलाईन सिबिल किंवा फिनटेक अॅप्सवरून फक्त दोन मिनिटांत तपासता येतं.

आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर थोड्या कागदपत्रांच्या आधारे झटपट कर्ज मंजूर होतं. याचाच फायदा सायबर चोरटे घेतात. पॅन कार्डवर कोणतंही अनधिकृत कर्ज सुरू आहे का, हे क्रेडिट रिपोर्टवरून तपासणं आणि फसवणूक झाली असेल तर तक्रार करणं खूप गरजेचं आहे.

अनेकदा आपल्या नावावर कर्ज आहे हे लोकांना कळतच नाही. बँकांचे वसुली अधिकारी फोन करतात किंवा सिबिल स्कोअर अचानक घसरतो, तेव्हाच ही गोष्ट समोर येते.

अनेक फिनटेक कंपन्या आणि इन्स्टंट लोन अॅप्स फक्त पॅन आणि आधार नंबरच्या आधारे काही मिनिटांत कर्ज मंजूर करतात. सायबर चोरटे वेगवेगळ्या डेटा लीकमधून किंवा बनावट फिशिंग लिंक्सवरून पॅन नंबर मिळवतात. त्यानंतर फोटोमध्ये फेरबदल करून किंवा बनावट मोबाईल नंबर जोडून कागदपत्रांचा गैरवापर करतात आणि कर्ज उचलतात.

याचा थेट फटका क्रेडिट प्रोफाईलला बसतो. आपण कर्ज घेतलेलंच नसतं, पण आपल्या नावावर ते दिसतं. त्याचे हप्ते भरले जात नाहीत, त्यामुळे सिबिल स्कोअर खराब होतो. पुढे खरोखर कर्ज हवं असेल, तेव्हा बँक कर्ज देत नाही.

अनधिकृत कर्ज आहे का हे पाहण्यासाठी सिबिल किंवा क्रेडिट रिपोर्ट तपासावा लागतो. त्यासाठी सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवर मोफत वार्षिक क्रेडिट रिपोर्ट पाहता येतो. याशिवाय OneScore, Paytm, गूगल पे किंवा Paisabazaar यांसारख्या नावाजलेल्या आणि सुरक्षित अॅप्सवर 'Check Credit Score' वर क्लिक करायचं. तिथे पॅन नंबर, मोबाईल नंबर आणि नाव टाकून OTP ने पडताळणी पूर्ण करायची.

रिपोर्ट डाऊनलोड केल्यावर 'Accounts' किंवा 'Active Loans' हा विभाग शोधायचा. तिथे आपल्या नावावर सध्या सुरू असलेली सगळी लहान-मोठी कर्जं आणि क्रेडिट कार्ड्स दिसतात. त्या यादीत आपण न घेतलेलं एखादं कर्ज दिसलं, उदाहरणार्थ 10,000 किंवा 20,000 रुपयांचं इन्स्टंट लोन, तर आपण सायबर फ्रॉडचे शिकार झालो आहोत असं समजावं.

फसवणूक झाली असेल तर आधी रिपोर्टमध्ये ज्या बँकेचं किंवा फायनान्स कंपनीचं नाव दिसतं, त्यांच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा आणि या फ्रॉड लोनबद्दल ई-मेलद्वारे लेखी कळवावं.

त्यानंतर सिबिलच्या वेबसाईटवर 'Raise a Dispute' हा पर्याय निवडून ते कर्ज आपलं नसल्याचा दावा नोंदवावा. सिबिल संबंधित बँकेकडून पडताळणी करून ते कर्ज रेकॉर्डमधून काढून टाकतं.

या फसवणुकीची अधिकृत तक्रार केंद्र सरकारच्या cybercrime.gov.in या सायबर पोर्टलवर नोंदवता येते. तसंच 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर फोन करूनही लगेच गुन्हा नोंदवता येतो. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल FIR दाखल करावी.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ