रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:49 IST

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंजसाठी राज्यातून ३८७८ अर्ज, १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. अर्ज १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन करता येतील.

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंजसाठी राज्यातून ३८७८ अर्ज, १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी उतरावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. मुंबईत मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कुलसचिव डॉ. वैभव नरवडे, सृजन ट्रस्टचे विश्वस्त दिपक मुकादम, डॉ. अमित नेहते आणि विज्ञान भारती कोकण प्रांतच्या अनुपमा कुलकर्णी यावेळी हजर होते.

लोढा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कौशल्य विभागातर्फे देशभरात सेवा संकल्प अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत ही बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धा घेतली जात आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग ही स्पर्धा घेत आहे. अर्जाची प्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरू झाली असून १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. आतापर्यंत महाराष्ट्रातून ३८७८ स्पर्धकांनी अर्ज केले आहेत आणि त्यांना कौशल्य विकास विभागाकडून मार्गदर्शन दिले जात आहे.

या स्पर्धेतून कृषी, आरोग्य, महिला सुरक्षा, नागरी विकास, पर्यावरण, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण आणि रोजगारक्षमता अशा क्षेत्रांतील समस्या समजून घेऊन त्यावर सर्जनशील उपाय सुचवण्याची संधी शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नवोन्मेषक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे गट, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, एमएसएमई, कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था आणि इतर इनोव्हेशन टीम्स यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेला वयाची अट नाही, त्यामुळे प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी विभाग काम करत असल्याचेही लोढा यांनी सांगितले.

अर्ज ऑनलाईन करायचा आहे. इच्छुकांनी https://sevainnovationchallenge.in/ या लिंकवर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून आपला प्रकल्प सादर करायचा आहे. पोर्टलवर पहिल्या टप्प्यात प्राथमिक माहितीची नोंदणी लागेल. दुसऱ्या टप्प्यात प्रकल्प सादर करताना आधार संलग्न वैयक्तिक माहिती आणि प्रकल्पाची माहिती द्यावी लागेल. सगळी प्रक्रिया ऑनलाईन असून उमेदवारांच्या शंका दूर करण्यासाठी संकेतस्थळावर चॅट बॉटची सोयही आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत उतरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने सृजन ट्रस्ट, पुणे आणि विज्ञान भारती कोकण प्रांत या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा, यासाठी या दोन्ही संस्था सहकार्य करणार आहेत. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे आणि स्पर्धेसाठी लागणारे मार्गदर्शन विज्ञान भारती कोकण प्रांतकडून विद्यार्थ्यांना मिळेल. सृजन ट्रस्ट स्पर्धेचा व्यापक प्रचार व प्रसार करून तरुण-तरुणींचा सहभाग वाढवणार आहे. हा ट्रस्ट दरवर्षी डिपेक्स या उपक्रमातून नवकल्पना, स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील तरुणांसाठी परिषद घेतो. नवकल्पना, संशोधन, स्टार्टअप आणि उद्योजकतेत काम करणाऱ्या तरुणांना यातून व्यासपीठ मिळेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ