रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:06 IST

लखमापूरच्या जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्याकडून करिअर मार्गदर्शन, 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत कार्यशाळा

'कर सहाय्यक' पदी निवड झालेले माजी विद्यार्थी छगन निवलकर यांनी शाळेतील मुलांना अभ्यास, कला-कौशल्य आणि स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले.

लखमापूरच्या जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्याकडून करिअर मार्गदर्शन, 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत कार्यशाळा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

शासनाच्या 'सेवा संकल्प अभियान २०२६' अंतर्गत तसेच 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष 'कला, कौशल्य व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा' घेण्यात आली. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. छगन निवलकर यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलावण्यात आले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 'कर सहाय्यक' (Tax Assistant) या पदावर त्यांची नुकतीच निवड झाली आहे. म्हणजेच ज्या शाळेत ते स्वतः शिकले, त्याच शाळेतील मुलांशी बोलण्यासाठी ते मार्गदर्शक म्हणून आले होते.

आपल्याच शाळेत शिकलेला माजी विद्यार्थी प्रशासकीय सेवेत चांगल्या पदावर पोहोचला आणि तो आपल्यासमोर उभा आहे, हे पाहून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. श्री. निवलकर यांनी अगदी सोप्या आणि प्रेरणा देणाऱ्या पद्धतीने मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले. शालेय वयापासूनच नियमित अभ्यास कसा करावा, वाचनाची सवय कशी लावावी, कला-कौशल्यांचा विकास कसा करावा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी, याबद्दल त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील मुलेही चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उच्च पदांपर्यंत पोहोचू शकतात, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्सुकतेने आणि आपुलकीने त्यांचे विचार ऐकून घेतले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदरणीय श्री. विनोद क्षीरसागर सर यांनी भूषवले. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विशेष म्हणजे, ज्या शाळेत आणि ज्या शिक्षकांकडून शालेय शिक्षण घेतले, त्याच शाळेत मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्याचा दुग्धशर्करा योग श्री. निवलकर यांच्यासाठी जुळून आला.

या प्रसंगी श्री. निवलकर यांना शिकवलेल्या कुमारी मंदा उरकुडे मॅडम, उपक्रमशील विज्ञान विषय शिक्षिका सौ. शोभना खैरे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. विनायक फुकट सर, श्री. चव्हाण सर आणि श्री. करतारसिंग अलावत सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे माजी विद्यार्थी आणि नवोदित अधिकारी श्री. छगन निवलकर यांचा मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थ सर्वत्र कौतुक करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ