शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:11 IST

अकोला जिल्ह्यात ४२ शिक्षक अतिरिक्त, तरीही १५ शाळा एकशिक्षकी

जिल्हा परिषदेच्या ९५० शाळा असलेल्या अकोला जिल्ह्यात ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत असतानाही १५ शाळांमध्ये अजून एकच शिक्षक आहे.

अकोला जिल्ह्यात ४२ शिक्षक अतिरिक्त, तरीही १५ शाळा एकशिक्षकी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत एक वेगळेच चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, तरीही तब्बल १५ शाळा अजून एकशिक्षकी आहेत, म्हणजेच तिथे फक्त एकच शिक्षक आहे. त्यामुळे या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्या एकूण ९५० शाळा आहेत. त्यांपैकी ९२० प्राथमिक शाळा असून ३० शाळा माध्यमिक आहेत. ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या टिकवण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. असे असतानाच ही परिस्थिती समोर आली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वी शिक्षकांची कमतरता हा नेहमीच चर्चेचा विषय असायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे काही शिक्षक अतिरिक्त ठरू लागले आहेत. जिल्ह्यातील ९५० शाळांमध्ये मिळून एकूण ५५ हजार विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. मंजूर शिक्षक पदांची संख्या ३ हजार ४२ आहे, तर प्रत्यक्षात ३ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

शिक्षक मंजूर करण्याचे निकष जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने सांगितले. जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या शाळेत ६० विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक मंजूर असतात. तिसरा शिक्षक हवा असेल, तर त्या शाळेची पटसंख्या किमान ७६ पेक्षा पुढे असावी लागते. इयत्ता सहावी ते आठवीसाठी ३५ पर्यंत पटसंख्या असल्यास एका वर्गासाठी एक पद मंजूर होते, आणि दोन वर्ग असल्यास दोन पदे मंजूर होतात. अशा परिस्थितीत शाळा पहिली ते सातवीपर्यंत असली, तरी तिथे चार शिक्षक मंजूर ठरतात, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.

खासगी शाळांसारखे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मिळाले, तर शाळेच्या पटसंख्येत भर पडेल. जिल्हा परिषदेत शिकलेला विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत टिकेल. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेत विषयानुसार शिक्षक असणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकावा, यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनी आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांना घडवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळेत मंजूर वर्गांचीच मुले शिकतात, असे व्याळा येथील पालक शीलवंत वानखडे यांनी म्हटले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ