सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल; वन अधिकारी कुठे आहेत, कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल

कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात झाडे तोडायला सुरुवात झाली आहे. जमिनी कोणी दिल्या, असा प्रश्न विचारला जात आहे.

टोरंट धरणाच्या बुडीत क्षेत्रात झाडांची कत्तल; वन अधिकारी कुठे आहेत, कर्जत पर्यावरण बचाव समितीचा सवाल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत टोरंट पॉवर कंपनी वीज प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाच्या दृष्टीने वेगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बुडीत क्षेत्रातील जमिनीवरची झाडे तोडायला सुरुवात झाल्याने कर्जत पर्यावरण बचाव समिती आक्रमक झाली आहे. ही झाडे तोडण्यासाठी जमिनी कोणी दिल्या, असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.

गुजरात राज्यातील टोरंट पॉवर ही कंपनी खलाटी येथील सायडोंगर भागात हायड्रॉलिक प्रकल्प उभारत आहे. या प्रस्तावित धरण प्रकल्पाला धरण परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तिथली ६४० हेक्टर जमीन वन विभागाची असून २३० हेक्टर खासगी जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. वनजमिनीवर लाखो झाडे आहेत आणि ती स्थानिकांनी श्रमदान करून लावली व वाढवली आहेत.

आता तीच सर्व झाडे तोडायला सुरुवात झाली असून धरणाच्या बुडीत क्षेत्रातील झाडे नष्ट होऊ लागली आहेत. बुडीत क्षेत्रातील काही जमीन खासगी आहे आणि त्या जमिनीवरील झाडेही तोडायला सुरुवात झाली आहे. १५००० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तीन नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्या वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंतप्रधान प्रकल्पाच्या परिसराची हवाई सफर करू शकतात आणि त्यामुळे टोरंट कंपनी प्रशासनाने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील झाडांची तोड हाती घेतली आहे.

सायडोंगर परिसरातील आदिवासी वाडीपासून पुढे जंगलात टोरंटकडून इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्याने झाडे तोडली जात आहेत. तोडलेली झाडे तिथून उचलण्यासाठीही कामगार लावले आहेत. शंभर वर्षे आणि त्याहून जुनी झाडे तोडली जात आहेत. संपूर्ण परिसर कोणत्याही झाडाच्या अडथळ्याविना दाखवता यावा, यासाठी सर्व झाडे तोडली जात आहेत.

मात्र तिथल्या ६४० हेक्टर जमिनीवर झाडे लावण्याचे कोणतेही नियोजन नाही. वन विभागाने जमीन प्रकल्पाला दिल्याचे कोणतेही पत्र वन विभाग स्थानिकांना देत नाही. असे कोणतेही पत्र आतापर्यंत सोशल मीडियावरही दिसून आलेले नाही, आणि तरीही झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कर्जत पर्यावरण बचाव समिती आक्रमक झाली आहे.

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन दिलेली नाही. असे असताना झाडे तोडली जात असतील, तर आपण कोणत्या जगात आहोत, असा प्रश्न कर्जत तालुक्यातील पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. बुडीत क्षेत्रातील झाडे तोडली जात असल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ