सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:35 IST

देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; चारा-पाणी नियोजनावर लक्ष देण्याच्या आमदार मनोज कायंदे यांच्या सूचना

अल निलोच्या संकटामुळे यंदा पाऊस कमी झाल्याने देऊळगाव राजा तालुक्यात पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, असे आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले.

देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; चारा-पाणी नियोजनावर लक्ष देण्याच्या आमदार मनोज कायंदे यांच्या सूचना छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अल निलोच्या संकटामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यात येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई आणि चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी दिल्या.

देऊळगाव राजा येथील व्यंकटेश कॉलेजमध्ये चारा आणि पाणीटंचाई यांच्या आढाव्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत आमदार कायंदे बोलत होते. बैठकीला सिंदखेड राजा महसूल उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, नायब तहसीलदार सायली जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ, दादाराव मसूदवाल आणि महावितरणचे नागरे उपस्थित होते. जलसंधारण, पाणीपुरवठा आणि कृषी विभागातील अधिकारीही बैठकीला हजर होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमधील पाणीसाठा कमी आहे. विहिरी आणि बोरवेलची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चपासूनच अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

या परिस्थितीत कायंदे यांनी अनेक सूचना केल्या. तालुक्यातील सर्व गावांचा पाणीटंचाई आराखडा तात्काळ तयार करावा, चारा आणि पाण्याची साठवणूक करावी, तसेच चारा डेपो आणि चारा छावण्या सुरू करण्यासाठी जागा निश्चित कराव्यात, असे त्यांनी सांगितले. चाऱ्याची अवैध वाहतूक आणि साठेबाजी रोखण्यासाठी चारा नियंत्रण आदेश लागू करावा, असेही ते म्हणाले. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरचे नियोजन करावे, अशीही सूचना त्यांनी केली.

खडकपूर्णा प्रकल्पातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. तो तात्काळ थांबवावा आणि अवैधरित्या टाकलेले विद्युत पंप बंद करावेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना पाणी व चाऱ्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आताच सतर्क होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. वेळ आली तर शेतकऱ्यांसमोर कोणतेही संकट उभे राहू नये, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी तालुक्यातील ग्रामसेवक आणि तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणार असल्याचेही आमदार कायंदे यांनी सांगितले. यावर्षी पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील ज्या खाजगी विहिरींना पाणी आहे, त्या विहिरीही पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ