सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:22 IST

नवरात्रीनंतर सणाला घरीच बनवा तोंडात विरघळणारे चुरमा लाडू

सणानिमित्त बाजारातल्या भेसळीच्या मिठाईऐवजी घरीच चुरमा लाडू करून पाहा; साहित्य आणि कृती सोपी आहे.

नवरात्रीनंतर सणाला घरीच बनवा तोंडात विरघळणारे चुरमा लाडू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवरात्री संपली की सणांची रांग सुरू होते. सण म्हटलं की घरात गोडधोड आलंच. अनेक घरांमध्ये सणानिमित्त रुचकर आणि गोड पदार्थ केले जातात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे चुरमा लाडू, जो चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही कधी चुरमा लाडू खाल्ला आहे का? सणानिमित्त ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहू शकता.

बाजारातून विकत आणलेली मिठाई खाणार असाल तर जरा सावध राहा, कारण आजकाल मिठाईत भेसळ वाढू लागली आहे. आरोग्यासाठी चांगली आणि ताजी मिठाई आपल्या स्वयंपाकघरातच तयार होऊ शकते. राजस्थानमध्ये ही रेसिपी जास्त करून केली जाते. आता वेळ न घालवता या लाडवासाठी काय काय लागतं आणि तो कसा करायचा, ते एकेक करून पाहू.

साहित्य: गव्हाचे पीठ २ वाट्या, बारीक रवा १ वाटी, बेसन अर्धी वाटी, साजूक तूप १ वाटी (गरजेनुसार), गूळ १ वाटी, काजू, बदाम आणि पिस्ता थोडे थोडे, खसखस २ चमचे, वेलची पूड अर्धा चमचा. कणीक मळण्यासाठी कोमट पाणी लागेल.

कृती: सगळ्यात आधी २ वाट्या गव्हाचे पीठ घ्या. त्यात १ वाटी रवा मिसळा. इथे बारीक रवाच वापरायचा आहे. रवा जाडसर असेल तर मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या.

आता एका भांड्यात बेसन, गव्हाचे पीठ आणि रवा घ्या आणि त्यात ३ चमचे तूप घाला. हे सगळे कोरडे साहित्य हाताने नीट एकत्र करा. मग थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्या.

पिठाचे दोन भाग करा आणि त्यांचे छोटे गोळे वळा. हे गोळे गरम तेलात किंवा तुपात तळून घ्या. नंतर गॅसवर कढई ठेवा, त्यात तूप घालून बदाम आणि काजू तळा आणि ते एका प्लेटमध्ये काढून ठेवा. त्यानंतर तुपात मावा घालून मंद आचेवर परतत ठेवा.

आता एका पातेल्यात अर्धी वाटी तूप घाला आणि तळलेल्या गोळ्यांचा चुरा करून त्यात टाका. चुरा तुपात छान भाजला की त्यात पिठीसाखर आणि तळलेल्या सुक्यामेव्याचे तुकडे घाला आणि गॅस बंद करा. तयार मिश्रण छान थंड झालं की हातानं गोल आकाराचे लाडू वळून घ्या. सणाला हा लाडू घरीच करून बघा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ