बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:13 IST

चिनी संशोधकांना पॅसिफिकच्या तळाशी ११,७०० नवे विषाणू सापडले; थेट धोका नसल्याचा दावा

समुद्राखालच्या धातूंचा तपास करताना चिनी संशोधकांना पॅसिफिक महासागराच्या तळाशी हजारो नवे विषाणू आढळले. मानवाला थेट धोका नसल्याचे पथकाचे म्हणणे आहे.

चिनी संशोधकांना पॅसिफिकच्या तळाशी ११,७०० नवे विषाणू सापडले; थेट धोका नसल्याचा दावा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चिनी संशोधकांच्या एका पथकाने पॅसिफिक महासागराच्या खोल तळाशी ११,७०० नवे विषाणू शोधून काढले आहेत. हे विषाणू समुद्राच्या तळाशी असलेल्या 'पॉलिमेटॅलिक नोड्यूल' (Polymetallic Nodule Zone) या धातूंच्या साठ्यांच्या परिसरात आढळले, असे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

हे पथक खरे तर समुद्राखालच्या मौल्यवान धातू आणि खनिजांच्या साठ्यांचा तपास करत होते. महासागराच्या तळाशी असलेल्या या खनिजांचा अभ्यास सुरू असताना संशोधकांना अत्यंत सूक्ष्म, पण प्रचंड संख्येने असलेल्या विषाणूंच्या प्रजाती दिसल्या.

या विषाणूंच्या जनुकीय रचनेचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा संशोधकही थक्क झाले. हे सर्व ११,७०० विषाणू जनुकीयदृष्ट्या एकमेकांशी अगदी जवळचे आहेत, म्हणजेच ते एकाच जैविक वर्गातील मानले जात आहेत. सूक्ष्मजीवशास्त्रात त्यांचा समावेश 'कौडोव्हिरिसेट्स' (Caudoviricetes) या वर्गात होतो.

अहवालानुसार, या विषाणूंच्या शेवटी सुईसारखी टोकदार रचना (टेल स्ट्रक्चर) असते. तिच्या मदतीने ते कोणत्याही जिवाणूच्या पेशींमध्ये आपले जनुकीय साहित्य थेट टोचू शकतात. प्रयोगशाळेतील अभ्यासात असे दिसले की, मानवी शरीरातील किंवा पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाच्या जिवाणूंना पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता हे विषाणू बाळगतात. ते समुद्रातील नेहमीच्या घटकांपेक्षा खूप जड आहेत आणि त्यांची संसर्ग पसरवण्याची पद्धत अत्यंत आक्रमक आहे.

चिनी संशोधक पथकाने लगेच स्पष्टीकरण दिले की, सध्याच्या परिस्थितीत या ११,७०० विषाणूंमुळे मानवी आरोग्याला किंवा सामान्य नागरिकांना कोणताही थेट धोका नाही. हे विषाणू समुद्राच्या हजारो मीटर खाली अतिशय उच्च दाब आणि थंड तापमानात राहतात, त्यामुळे ते मानवी वस्तीत पसरण्याची शक्यता सध्या तरी नगण्य आहे, असे पथकाचे म्हणणे आहे.

मात्र प्रसिद्ध संशोधन नियतकालिक 'नेचर'ने (Nature) यावर चिंता व्यक्त केली आहे. नेचरच्या म्हणण्यानुसार, हे विषाणू सध्या माणसावर हल्ला करत नसले, तरी मानवी शरीरातील किंवा पर्यावरणातील उपयुक्त जिवाणू ते मारू शकतात. हे विषाणू पुढे उत्परिवर्तित (Mutate) झाले किंवा समुद्री जीवांमार्फत मानवी अन्नसाखळीत आले, तर गंभीर आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे चीनने या संशोधनाची सर्व आकडेवारी जगासमोर पारदर्शकपणे मांडणे गरजेचे आहे, असेही नेचरचे म्हणणे आहे.

यानिमित्ताने कोरोनाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. २०१९ मध्ये चीनमधील वुहान शहर आणि तिथल्या प्रयोगशाळेतून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजवला होता. त्या महामारीत जगभरात ७१ लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला, तर कोट्यवधी लोकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. सुरुवातीला चीनने त्या विषाणूच्या धोक्याची तीव्रता जगापासून लपवून ठेवली, असा आरोप जगभरातून केला जातो.

त्यामुळेच आता ११,७०० नव्या विषाणूंची माहिती समोर आल्यावर आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना आणि वैज्ञानिक वर्ग सतर्क झाला आहे. महासागराच्या तळाशी असे अब्जावधी अज्ञात विषाणू गाडले गेलेले आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे ते बाहेर आले, तर जगाला नव्या जैविक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ